मयूरी अनुप देशमुखCotton Crop Management : सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे कापूस पिकाची कायिक वाढ जोमात झाली आहे. उत्पादनाच्या दृष्टीने ही कायिक वाढ नियंत्रणात ठेवण्याची आवश्यकता असते. अन्यथा कापसाचे उत्पादन कमी राहण्याचा धोका असतो. त्याच प्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची सघन पद्धतीने लागवड केलेली आहे. अशा शेतकऱ्यांनीही कायिक वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यवस्थापन करण्याची गरज असते. त्यामुळे उत्पादनातील वाढीसोबतच गुणवत्ताही चांगली मिळते. .कपाशीची सघन लागवड सामान्यतः मध्यम खोल जमिनीत ९० × ३० सेंमी या अंतरावर आणि उथळ जमिनीत ९० × १५ सेंमी या अंतरावर केली जाते. त्यामुळे झाडांची एकरी संख्या अनुक्रमे १४,८१४ आणि २९,६२९ इतकी असते. या पद्धतीमध्ये एका जागी एकच बी लावले जाते. एकरी झाडांची वाढलेली संख्या आणि झालेली अतिरिक्त कायिक वाढ यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा स्थितीमध्ये कायिक वाढीचे वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्थापन करण्याची आवश्यकता असते. त्यात फांद्या छाटणे, शेंडे खुडणे आणि इतर प्रक्रियांचा समावेश असतो. कपाशीची गळफांदी काढणे व शेंडा खुडणे, याला ‘दादा लाड तंत्रज्ञान’ म्हणतात. या तंत्रज्ञानाचा अवलंब करून बऱ्याच शेतकऱ्यांचे कापूस पीक उत्पादन वाढल्याचे निदर्शनास आले आहे..कायिक वाढ व्यवस्थापनकपाशीचे पीक हे ३० ते ४५ दिवसांचे झाले की त्याची गळफांदी मूळ खोडापासून १ इंच लांब कटरच्या साह्याने काढून टाकावी. या फांद्या एका झाडावर १ ते ४ असू शकतात. त्यांना अचूकपणे ओळखून त्यांची वाढ होण्याआधी काढून टाकाव्यात.८५ ते ९० दिवसांनंतर किंवा कापूस कमरेएवढा झाल्यानंतर कपाशीचा मुख्य शेंडा खुडावा. झाडाची उंची ३.५ ते ४ फूट झाली की शेंडा खुडावा.\.Cotton Weed Management: कापूस पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन.गळफांदी कशी ओळखावी?कापसाच्या झाडावर दोन प्रकारच्या फांद्या असतात. एक गळफांदी (मोनोपोडिया), दुसरी फळफांदी (सिम्पोडिया). या दोन्ही फांद्यांची लक्षणे...गळफांदी : गळफांदी सुरुवातीलाच येते. एका झाडावर त्या तीन किंवा चार असतात. या फांद्याच्या फक्त शेंड्यावर ३ ते ४ बोंडे लागतात. या फांद्या वाढीसाठी मुख्य झाडाला स्पर्धा करतात. झाडाला दिलेले ७० टक्के खत गळफांद्या घेतात. गळफांदी जोमाने वाढते. यांची जाडी मुख्य खोडाएवढी होते. त्यावरील बोंडांची संख्या कमी राहून वजनही कमी (अर्धा ते दीड ग्रॅम) भरते.फळफांदी : गळफांद्यांनंतर फळफांद्या येतात. त्या जमिनीला समांतर आडव्या वाढतात. या फांद्यांची जाडी वाढत नाही. खोडाकडून आलेला अन्नरस त्या बोंडाला देतात. जेवढा अन्नरस मिळेल, तेवढ्या प्रमाणात फळफांद्यांवर बोंडे लागतात. त्यांचे पोषण होऊन बोंडे वजनदार येतात. एका झाडावर साधापणपणे १२ ते १५ फळफांद्या असतात..झाडाचा शेंडा : ८५ ते ९० दिवसांनंतर किंवा कापसाच्या झाडाची उंची ही ३- ४ फूट एवढी झाल्यावर मुख्य शेंडा खुडावा. यामुळे झाडाची उंची मर्यादेत राहून झाडाची शाकिय वाढ जास्त होते. बोंडे भरण्यास आणि बोंडातील कपसाचे वजन वाढण्यास मदत होते.यासोबतच अतिसघन कापूस लागवडीमध्ये कायिक वाढ रोखण्यासाठी मेपीक्वॉट कलोराइड या वाढनियंत्रकाची फवारणी फायद्याची दिसून आली आहे. पिकाच्या वाढीच्या कालावधीनुसार मेपीक्वॉट कलोराइड या वाढनियंत्रकाची फवारणी करण्याचे वेळापत्रक दिलेले आहे. (तक्ता १).Cotton Crop Management : वाढीच्या अवस्थेत करावयाची आंतरमशागतीचे कामे.कायिक वाढ व्यवस्थापनाचे फायदेगळफांदी काढल्यामुळे झाडाने उचललेले सर्व अन्नद्रव्ये फळफांदीकडे जाते. यामुळे त्यांची जोमाने वाढ होते.जमिनीतील सर्व अन्नद्रव्ये, ओलावा हा फक्त फळ फांद्याना मिळाल्यामुळे बोंडाची संख्या व वजन वाढण्यास मदत होते.झाडामध्ये दाटी होत नाही, परिणामी हवा खेळती राहते..उत्पादन खर्चात बचत होते.गळ फांद्या कापल्याने व झाडाची उंची कमरेएवढीच ठेवल्याने सर्व झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो.झाडाला मोकळी हवा मिळाल्याने रोगांचा (उदा. बुरशींचा) प्रादुर्भाव कमी राहतो. परिणामी फवारणीवरील खर्चात मोठी बचत साधते.फुले, पात्या, बोंडांना सूर्यप्रकाश मिळाल्याने त्यांची गळ होत नाही.लांब दांडीचे पाने व जास्तीच्या फांद्या कापल्याने रसशोषक किडीचा प्रादुर्भावही कमी राहतो. तसेच फवारणीमध्ये कव्हरेज चांगले मिळते.मयूरी अनुप देशमुख, ९२८४५२२२८४(लेखिका मृदा शास्त्रज्ञ आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.