Pune News: पिंपरखेड येथे वन विभागाने नरभक्षक बिबट्याला गोळया घालून ठार केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. बिबट्याला पिंजऱ्यात ठेवू नका, आता त्यांना गोळ्यांच घाला. तरचं आमच्या लेकराबाळांचे जीव वाचतील, त्यांनी आमच्या डोळ्यांदेखत आमची लेकरं मारली, त्यांनाही आमच्या समोरच मारा, अशी आर्त हाक पंचक्रोशीतील मायमाऊली करू लागल्या आहेत. .शिरूर तालुक्यातील घोड व कुकडी नदीचा शेतीने समुद्ध म्हणून ओळखला जाणाऱ्या बेट भागातील पिंपरखेड, जांबुत या दोन गावांत वीस दिवसांमध्ये १२ ऑक्टोबरला शिवन्या बोंबे (वय साडेपाच वर्षे), २२ ऑक्टोबरला भागुबाई जाधव (वय ८२) तर २ नोव्हेंबरला रोहन बोंबे (वय १३) यांचा बिब्ट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळला आहे..Leopard Conflict: पाचशे बिबटे वनताराला पाठविणार : वनमंत्री नाईक .जुन्नर, शिरूर, आंबेगाव व खेड या तालुक्यांमधील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांच्या निषेधार्थ १२ व २२ ऑक्टोबरला पंचतळे येथे बेल्हे जेजुरी राज्यमार्ग रोखून तसेच ३ नोव्हेंबरला मौजे मंचर येथे पुणे नाशिक महामार्ग रोखून चारही तालुक्यांतील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केले होते..तसेच २ नोव्हेंबर रोजी बिबट हल्ल्यात रोहन बोंबे याचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने वन विभागाचे गस्ती वाहन तसेच येथील स्थानिक बेस कॅम्प इमारत पेटवून देऊन मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली होती. संतप्त नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्ग सुमारे १८ तास रोखून धरला होता. त्यामुळे प्रसासनावरील दबाव वाढला होता..Leopard Attack: बिबट्याला ठार करा, शेतकरी संतप्त.या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाईचे आदेश दिले होते. अखेर वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी (ता. ४) तातडीने मंत्रालयात बैठक घेऊन बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या. बिबट्यास जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वनसंरक्षक पुणे आशिष ठाकरे यांनी तातडीने प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांची परवानगी घेतली होती..वन विभागाने रेस्क्यू संस्था पुणेचे डॉ. सात्विक पाठक, पशु चिकीत्सक जुबिन पोस्टवाला व डॉ. प्रसाद दाभोळकर या दोन शार्प शूटरसह वन विभागाचे पथक घटनास्थळी तळ ठोकून होते. मंगळवारी रात्री या शॉर्प शूटरची सुत्रे हलली. शिरूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले, की मंगळवारी रात्री तीन थर्मल ड्रोनच्या माध्यमातून घटनास्थळाच्या परिसरात त्या नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला..रोहनच्या घरापासून सुमारे ४०० ते ५०० मीटर अंतरावर बिबट दिसून आला. शार्प शूटर टीमने त्यास बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला, परंतु तो अपयशी ठरला. तसा बिबट चवताळून हल्ला करीत होता. त्याने शार्प शूटरवरही हल्ल्याचा प्रयत्न केला. अखेर शार्प शूटरनी गोळी झाडली अन् क्षणात बिबट्या जमिनीवर कोसळला. रात्री साडे दहा वाजता मोहीम फत्ते झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.