अशोक सिदवाडकर Agriculture News : माळशिरस येथील तालुका बीज गुणन क्षेत्राची ५२ एकर शेती सुविधांच्या अभावामुळे पडीक आहे. प्रलंबित प्रस्ताव मंजूर करून भरीव निधी उपलब्ध करून दिल्यास या क्षेत्रात पिके घेणे शक्य होणार आहे..माळशिरस शहरालगत आळंदी- पंढरपूर पालखी मार्गावर पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणालगत तालुका बीज गुणन क्षेत्र विभागाची २१.३० हेक्टर म्हणजेच ५२ एकर शेतजमीन आहे. या शेतीमधून नीरा कालवा क्रमांक ५९ जातो. कालव्याच्या पश्चिमेला ४० एकर, तर पूर्वेला १२ एकर जमीन आहे. या ठिकाणी दोन विहिरी असून पाणी उपसा करण्याची सुविधा नाही..Pomegranate Farming: कोनड खुर्द बनले डाळिंबाचे क्लस्टर .अनेक वर्षांपूर्वी केलेली पाइपलाइन खराब झाली आहे. विहिरीवर पाइपलाइन करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला असून, तो अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सोलारचा प्रस्तावही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे..Coriander Intercropping: उसातील कोथिंबिरीची नियोजनबद्ध शेती.पाण्याची सुविधा नसल्याने जमीन पडीक पडली आहे. येथील शेतीची अवजारे गंजत असून मशागतीसाठी असलेला ट्रॅक्टर अनेक वर्षांपासून बंद आहे. येथे उपकृषी अधिकारी व एक सहायक कृषी अधिकारी पद असून, दोन मजूर आहेत. या वर्षी पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने जमीन पडीक आहे. नीरा कालव्याची सुविधा असली तरी साधारण ९० दिवसांनी पाणी सोडले जाते. मध्यंतरीच्या काळात पिकांना पाण्याची गरज असते. मात्र, कोणतीही सुविधा नसल्याने जमीन पडीक ठेवण्यात आली आहे. शासनाने विहीर दुरुस्त करून सोलार मोटार बसवावी आणि नवीन पाइपलाइन करणे गरजेचे आहे; अन्यथा एवढे मोठे ५२ एकर क्षेत्र पडीक राहणार आहे.माळशिरस कृषी विभागाचा सोलार प्रस्ताव दाखल झाला आहे. त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर तो तांत्रिक मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.- रणजित काळे, उपअभियंता, यांत्रिकी विभाग, जि. प. सोलापूर.या वर्षी पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने या जमिनीवर पेरणी करता आलीच नाही. गतवर्षी पाऊस झाल्यानंतर १५ हेक्टरवर तूर घेतली होती. त्यातून १३९ क्विंटल उत्पन्न मिळाले होते. विहिरीचे काम करून पाइपलाइन आणि मोटार बसविणे आवश्यक आहे.- एस. एस. शिनगारे, उपकृषी अधिकारी, माळशिरस.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.