Environmental Public Hearing: अदानी रिन्यूएबल एनर्जी फिफ्टी-टू लिमिटेड कंपनीच्या प्रस्तावित १५०० मेगावॉट क्षमतेच्या माळशेज घाट-भोरंडे उदंचन प्रकल्पासंदर्भातील पर्यावरणविषयक जनसुनावणी शुक्रवारी (ता. २१) होणार आहे. .अजनावळे (ता. जुन्नर) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत दुपारी १२ वाजता ही जनसुनावणी होईल. दरम्यान, पर्यावरणाची हानी होण्याची भीती व्यक्त करीत स्थानिक आदिवासी गावांनी प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. जुन्नर (जि. पुणे) आणि मुरबाड (जि. ठाणे) भागांत गावागावांत आंदोलने सुरू आहेत..Land Acquisition: परिक्रमा मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया पारदर्शकपणे राबवविणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद .‘पर्यावरण आघात मूल्यांकन अधिसूचना, २००६’ अन्वये ही जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हादंडाधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा पर्यावरणविषयक जनसुनावणी समितीच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी होणार आहे..Nashik Ring Road: शेतकऱ्यांना विश्वासात न घेता झालेली सुनावणी मान्य नाही.अहमदाबाद (गुजरात) येथील अदानी रिन्यूएबल एनर्जी फिफ्टी-टू लिमिटेड कंपनीने हा उदंचन प्रकल्प प्रस्तावित केला आहे. प्रकल्पाच्या पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणीची जाहिरात २२ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. नियोजित दिवशी आणि वेळेत जनसुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे यांनी दिली..प्रकल्पबाधित गावांची बैठकजुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी शुक्रवारी (ता. १४) अजनावळे येथे प्रकल्पबाधित गावांतील ग्रामस्थांची बैठक घेतली. या बैठकीत ग्रामस्थांनी प्रस्तावित प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला. पर्यावरणाची हानी करणारा हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.