Emergency Rescue: मालेगाव : मालेगाव- कुसुंबा रस्त्यावर वडगाव गावाजवळ दोन ट्रकमध्ये झालेल्या अपघातात ट्रकला आग लागून एक जण भाजला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणून ट्रकमध्ये अडकलेल्या गुजरातच्या चालकाचे प्राण वाचविले. अपघातात वडगाव येथील ५२ वर्षीय व्यक्ती गंभीर भाजला आहे..आयशर (एमएच २० ईजी ४०२८) कुसुंबाकडे जाणाऱ्या ट्रक (जीजे १६ एव्ही ७१९१) यांच्यातील अपघातात ट्रकची डिझेल टँक फुटल्याने दोन्ही ट्रकला आग लागली. या प्रकरणी आयशर चालक यांच्या तक्रारीवरून गुजरात ट्रकचालकाविरुद्ध सायकांळी उशिरापर्यंत वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते..Naib Tehsildar Accident: जुन्नरचे नायब तहसीलदार गवारी यांचा अपघातात मृत्यू.अपघातातील ट्रकची डिझेल टाकी फुटल्याने आग लागली. एका ट्रकमध्ये रासायनिक टाक्या होत्या तर दुसऱ्या ट्रकमध्ये सफेद रंगाच्या गोण्या होत्या. आगीनंतर परिसरातील नागरिकांना मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार यांना माहिती दिली. श्री. पवार यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत जिवीत हानी टळली..Farmer Accident: चाऱ्याच्या गंजीला लागलेल्या आगीत शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू .आयशर ट्रक (एमएच २० ईजी ४०२८) केबिनमध्ये चालक शफीक इस्माईल बेग यांचा पाय तुटून अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी चालकालाबाहेर काढले..आगीत लागल्यानंतर केमिकलच्या टाक्या उडत होत्या. रस्त्याचा कडेला असलेल्या घरांना व दुकानांना आग लागून वडगाव परिसरात देखील नुकसान झाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.