Nashik News: मालेगाव तालुक्याला अतिवृष्टीमुळे ऑगस्टमध्ये दुसऱ्यांदा फटका बसला. यापूर्वी तर कळवाडी तर आता झोडगे महसूल मंडळात नुकसान पुढे आले आहे. शुक्रवारी (ता. २९) झालेल्या पावसामुळे तालुक्यात १ हजार ८३४ हेक्टर क्षेत्रावर फटका बसला आहे. यामध्ये प्रामुख्याने कापूस, मका, कांदा व भाजीपाला पिकांचे नुकसान आहे. .यासह काही कांदा रोपवाटिकांचेसुद्धा नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक नुकसान अहवालानुसार तालुक्यातील झोडगे महसूल मंडलातील झोडगे, टोकडे, अस्ताणे, कंधाणे, मोहपाडा, भिलकोट, पळासदरे गुगुळवाड, देवारपाडे, साजवहाळ, चिखलओहोळ, नाळे शेंदुर्णी या १२ गावांमध्ये नुकसान आहे. तर २,७२५ शेतकरी बाधित आहेत. नाळे, शेंदूर्णी, झोडगे, कंधाने या गावांमध्ये नुकसान सर्वाधिक आहे..Marathwada Heavy Rainfall: तीन जिल्ह्यांतील दहा मंडलांत अतिवृष्टी; नांदेडमध्ये जोर अधिक .यापूर्वी १६ ते १८ ऑगस्टदरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने कळवाडी महसूल मंडलातील १२ गावांमध्ये ४ हजार ३५ हेक्टर क्षेत्रावर मोठे नुकसान समोर आले होते. त्या वेळी कापूस व मका पिकाचे नुकसान होते. तर मागील सप्ताहात डोंगराळे परिसरात ७४ मिमी पावसाची नोंद झाली. येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे दाणादाण उडाली होती..Nanded Heavy Rainfall: कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट मदतीचा प्रयत्न.या भागात कांदा लागवडी सुरू होत्या. अचानक आलेल्या पावसामुळे कांदा लागवडी थांबल्या. पावसाचा जोर वाढल्याने लागवडी पाण्याखाली गेल्या होत्या. तर शिवारात पाणी शिरून वाहिल्याने काही ठिकाणी कांदा रोपे वाहून गेले. काही ठिकाणी कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले..पीकनिहाय नुकसान असे पीक बाधित क्षेत्र (हेक्टर)कापूस १४०७ मका ३३४ कांदा ६१भाजीपाला व इतर पिके ३२ .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.