Sugarcane Crop Loss: चिंचगव्हाण(ता.मालेगाव) येथे लोंबकळणाऱ्या वीजतारांच्या शॉर्टसर्किटमुळे ऊसाच्या शेताला भीषण आग लागली. या आगीत सुमारे १५ एकरांवरील ऊस जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे अंदाजे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.तसेच ठिबक सिंचन संचासह अन्य कृषी साहित्याचे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे..मिळालेल्या माहितीनुसार, चिंचगव्हाण येथील शेतकरी महेंद्रसिंग दला पवार यांच्या गट क्रमांक ३० मधील ४ हेक्टर ५१ आर आणि भूषण महेंद्रसिंग पवार यांच्या गट क्रमांक ३० मधील ०.९७ आर क्षेत्रावरील काढणीला आलेला ऊस पूर्णपणे जळाला.यासोबतच, महेंद्रसिंग पवार यांच्याच गट क्रमांक ३१ मधील १ हेक्टर ९ आर क्षेत्रावरील ऊस पीकही या आगीत भस्मसात झाले..Sugarcane Crop Management: गारपीटग्रस्त स्थितीतील ऊस पिकाचे व्यवस्थापन.या अचानक आलेल्या संकटामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला असून,’’बँकेचे कर्ज आणि हातउसणे घेतलेले पैसे कसे फेडायचे,’’ असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे..Sugarcane Care: एल निनोच्या संकटात ऊस पिकाची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या महत्त्वाचे उपाय.घटनेची माहिती मिळताच महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी तलाठी महेंद्र शेट्टे, कृषी सहायक एस. एस. मोरे, ग्रामविकास अधिकारी डी. वाय. सरदार, सरपंच रवींद्र मांडवडे आणि नरडाणे येथील प्रगतशील शेतकरी संजय सरावत उपस्थित होते..महावितरणच्या हलगर्जीपणावर शेतकऱ्यांचा संताप“सुमारे तीन महिन्यांपूर्वीच या परिसरातील लोंबकळणाऱ्या वीजतारा आणि शेजारील ट्रान्सफॉर्मरबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी महावितरणला लेखी निवेदन दिले होते व संभाव्य दुर्घटनेची कल्पना दिली होती. मात्र, महावितरणने वेळेत आवश्यक उपाययोजना न केल्यामुळेच ही दुर्घटना घडली आहे.”.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.