Nashik News: मालेगाव येथील मालेगाव शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाची मुदत २०२३ मध्ये संपल्याने पुढील प्रक्रिया राबविण्यासाठी प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) म्हणून मालेगाव उपनिबंधक कार्यालयाचे सहकार अधिकारी स्वप्नील मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. .शेतकरी संघाचे व्यवस्थापक व संचालक मंडळ प्रशासकांना पदभार देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येथील तहसीलदारांनी सहकार कायद्यातील तरतुदीनुसार संघाचा सक्तीने पदभार घेण्यासंदर्भात आदेश पारीत केले. मालेगाव कॅम्प पोलिसांच्या उपस्थितीत प्रशासक मोरे यांनी पदाचा कार्यभार स्विकारला..Farmer Cooperative Union : शेतकरी संघात डिझेल विक्रीवरून गैरव्यवहार, अध्यक्षांनी केला खुलासा.येथील मालेगाव शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या २०२३ च्या निवडणूकीत चुकीच्या मतदार याद्यांमुळे मतदारांना निवडणुकीपासुन वंचित ठेवल्याची हरकत संघाचे सभासद राजेंद्र जाधव, सुनील पवार व इतर वंचित मतदार सभासदांनी घेतल्या होत्या. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडेही तक्रार केली होती..Cooperative Office Building: छत्रपती संभाजीनगर येथे प्रशस्त सहकार संकुलाची निर्मिती करा.भुसे यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार सहकार विभागाने निवडणुकीस स्थगिती देत सहा महिने मुदतवाढ देऊन प्रशासकाची नेमणूक करून सदोष मतदार याद्या तयार करणेबाबत आदेश दिले होते. त्या आदेशा विरुद्ध संघाच्या तत्कालीन संचालक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत स्थगिती मिळविली होती. २२ जानेवारी २०२६ ला उच्च न्यायालयाने स्थगिती उठवत पुढील प्रक्रिया करणेबाबत आदेश दिले होते..याचिका न्यायालयाने फेटाळलीसदोष मतदारयाद्या प्रकरणी शेतकरी संघाचे संचालक भूषण गोलाईत व सभासद अद्वय हिरे यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळत निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्राधिकृत अधिकारी म्हणून मालेगाव उपनिबंधक कार्यालयाचे सहकार अधिकारी स्वप्नील मोरे यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.