Washim News: ‘मनरेगा’अंतर्गत निवड केलेल्या किन्हीराजा या दत्तकगावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. जलसंधारण, पर्यावरण संवर्धन, पर्यटन विकास आणि रोजगारनिर्मिती यांचा समन्वय साधून गावाचा दीर्घकालीन व नियोजनबद्ध विकास करणे गरजेचे असल्याचे मत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी व्यक्त केले..जिल्हाधिकाऱ्यांनी दत्तक गाव किन्हीराजा परिसरात शिवार फेरी करीत गावातील महत्त्वाच्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, भाप्रसे पर्यवेक्षण अधिकारी व गटविकास अधिकारी आकाश वर्मा, तहसीलदार दीपक पुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, सहायक गटविकास अधिकारी रमेश कंकाळ आणि महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण समन्वयक नीलेश घुगे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते..Village Development: हिवरे बाजार आदर्श गावांसाठी प्रेरणास्रोत.फेरीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा तलाव, पौराणिक महत्त्व असलेला छोटा तलाव, डॉ. सलीम अली कॅम्प काटेपूर्णा अभयारण्य, सोनल धरण परिसरातील ई-क्लास जमीन आणि काटेपूर्णा इंटरचेंज समृद्धी महामार्ग यांसारख्या ठिकाणांची पाहणी केली. या नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत व नियोजनबद्ध वापर कसा करता येईल, यावर संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली..Village Development Success : कृषीसह ग्रामविकासात दरी गावाने उभारले वैभव.पर्यटन विकासासाठी जंगल सफारी, फळबाग लागवड, रेशीम उद्योग विकास, शेततळेनिर्मिती, रोपवे, बांबूवन विकास, तलावांचे सौंदर्यीकरण आणि समृद्धी महामार्गावर प्रवाशांसाठी माहिती फलक व दिशादर्शक सुविधा उभारण्यासंबंधी विविध संकल्पना मांडल्या होत्या. .यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळून गावाचा आर्थिक विकास घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. श्री. कुंभेजकर यांनी सांगितले, की किन्हीराजा गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी एकात्मिक व दूरदृष्टीपूर्ण आराखडा तयार करणे आवश्यक आहे. यामुळे किन्हीराजा गाव प्रकल्पाचा आदर्श गाव म्हणून उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.