Majhi Vasundhara Campaign Sangli: सांगली : माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत सांगली जिल्हा परिषदेने सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. उत्कृष्ट कामगिरीत तासगाव पंचायत समितीने राज्यात प्रथम, मिरज पंचायत समितीने द्वितीय; तर कवठेमहांकाळ पंचायत समितीने तिसरा क्रमांक पटकावला. जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींनी तब्बल ११ कोटींचे बक्षीस मिळविले आहे..पर्यावरणपूरक उपक्रम, स्वच्छता, जलसंधारण, ऊर्जा बचत, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, जैवविविधता संवर्धन यांसारख्या विविध घटकांवर आधारित गुणांकन केले जाते. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून विविध उपक्रम राबवून पर्यावरण संरक्षणाची प्रभावी चळवळ उभी केली आहे. त्यामुळे जिल्ह्याला राज्यस्तरावर विशेष पुरस्कार मिळाले आहेत..एक हजार लोकसंख्या गटात पिंपळवाडीचा राज्यात द्वितीय क्रमांक आला आहे. १ हजार ते १.५ हजार लोकसंख्येत अलकूड एम ग्रामपंचायतीला विभागस्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला. २ ते ३ हजार लोकसंख्या गटात नांगोळी (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम; तर लंगरपेठने राज्यात तृतीय क्रमांक मिळविला. ३ ते ५ हजार लोकसंख्येत आळसंद (ता. खानापूर) ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम, तर वाळेखिंडी (ता. जत) ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळविला आहे. याच गटात धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीला विभागस्तरावर दुसरा क्रमांक मिळाला आहे. ५ ते १० हजार लोकसंख्या गटात येडेनिपाणी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याच ग्रामपंचायतीला भूमी थिमेटिक प्रकरात राज्यस्तरावर पहिला; तर मिरज तालुक्यातील सलगरे ग्रामपंचायतीने विभागस्तरावर दुसरा क्रमांक पटकावला आहे. १० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या गटामध्ये वाळवा तालुक्यातील वोरगाव ग्रामपंचायतीने राज्यात द्वितीय व कासेगावने तृतीय क्रमांक पटकावला आहे..Majhi Vasundhara : दहा ग्रांमपंचायतींना ‘माझी वसुंधरा’मधून ४ कोटींची बक्षिसे.विभागस्तरात पेठ ग्रामपंचायतीला दुसरा क्रमांक मिळाला आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांचा मुंबईत २१ फेब्रुवारी रोजी मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे..Majhi Vasundhara Abhiyan : पर्यावरणाचे संवर्धनासाठी माझी वसुंधरा अभियान.जिल्ह्यातील लोकसहभाग, प्रभावी नियोजन आणि पर्यावरणाची बांधिलकी यामुळे जिल्हा परिषदेने सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे यामध्ये योगदान आहे.- शशिकांत शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, सांगली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.