Chhatrapati Sambhajinagar News: फुलंब्री तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या शासकीय मका खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते झाले. या केंद्रामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल शासनाच्या हमीभावाने विकण्याची सोय झाली असून, त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे..चव्हाण म्हणाल्या की, ‘शासकीय खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांचे दलालांवरील अवलंबन कमी होऊन त्यांना कष्टाचा योग्य मोबदला मिळेल. शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत.’.Maize Procurement: कन्नड तालुक्यात ६६१ नोंदण्या झाल्या पूर्ण.संघाचे चेअरमन आनंदा कोलते यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संघाचे संस्थापक चेअरमन नामदेव कोलते, बाजार समितीचे उपसभापती दत्तू करपे, संचालक सर्जेराव मेटे, आप्पाराव काकडे, जगन दाढे, सुनील तायडे,.Maize Procurement: मोहोळमध्ये मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी.बाळासाहेब तांदळे, राजेंद्र डकले, योगेश जाधव, माधवराव जाधव, सचिव मनोज गोरे, संघाचे उपाध्यक्ष रामदास सोनवणे, संचालक विठ्ठलराव कोलते, लहू मानकापे, सुदाम पवार, जनार्दन साबळे, सहायक निबंधक आर.आर. दंडगव्हाळ, .आनंदा बनकर, नगरसेवक गणेश राऊत, सुमित प्रधान, कलीम पटेल, भाऊसाहेब काकडे, एकनाथ चित्रक यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप मंडळ अध्यक्ष सुचित बोरसे यांनी सूत्रसंचालन, तर बाजार समितीचे माजी संचालक विजय मोरे यांनी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.