Maize Procurement: हमीभावाने मका खरेदीत कमी उद्दिष्टाचा अडथळा
MSP Procurement: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मका खरेदीला दिलेल्या उद्दिष्टामुळे मर्यादा येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उद्दिष्ट वाढीसाठी पाठविलेल्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी न मिळाल्याने खरेदी थांबण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम मका दरांवर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होऊ शकतो.