Pune News: राज्यात हमीभावाने केवळ ३ लाख १० हजार टन मका खरेदीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. खरेदीचे उद्दिष्ट उत्पादनाच्या तुलनेत खूपच कमी आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये खरेदीची मर्यादाही कमी आहे. सध्या मोजक्या ठिकाणीच खरेदी सुरू झालेली आहे. त्यामुळे मका उत्पादकांना दिलासा देण्यासाठी खरेदी उद्दीष्ट आणि जिल्हानिहाय मर्यादा तसेच खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत..मागील चार वर्षांत मक्याला चांगला भाव होता. त्यामुळे हमीभावाने मका खरेदीची गरज पडली नाही. यंदा मात्र भाव नीचांकी आहे. मागील वर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रति क्विंटल २१०० ते २२०० रुपये दर होता. यंदा भाव १५०० ते १६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सरकारने यंदा २४०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. हमीभावापेक्षा बाजारात दर कमी असल्यामुळे मक्याची सरकारी खरेदी सुरू करण्यात आली..Maize Price Crash: मका उत्पादकांची गोची.राज्यात आतापर्यंत ७९ खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. खरिपातील मक्याची आवक प्रामुख्याने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांमध्ये जास्त असते. त्यामुळे मागणी आल्यास आणखी केंद्रांना मान्यता देण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.खरेदीची मर्यादा कमीअनेक जिल्ह्यांमध्ये मका खरेदीची मर्यादा खूपच कमी आहे. अमरावती आणि सांगली जिल्ह्यात तर फक्त ११ क्विंटलची मर्यादा देण्यात आली आहे. केवळ यवतमाळ, बुलडाणा, नाशिक आणि सातारा जिल्ह्यात ३० क्विंटलपेक्षा अधिकची मर्यादा आहे. मका उत्पादक खानदेशातही खरेदीची मर्यादा खूपच कमी आहे. त्यामुळे खरेदीची मर्यादा वाढवावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत..Maize Procurement: कर्नाटक सरकार प्रत्येक शेतकऱ्याकडून ५ क्विंटल मका खरेदी करणार.खरेदी नगण्यराज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये मका खरेदी सुरू करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमधील १६ हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत मका विक्रीसाठी नाव नोंदणी केली. मात्र आतापर्यंत केवळ ४१९ क्विंटल खरेदी झाली आहे. खरेदीला वेग येण्यासाठी केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी शेतकरी करत आहेत..जिल्हानिहाय मका खरेदीचीमर्यादा (क्विंटल/हेक्टर)जिल्हा मर्यादाछत्रपती संभाजीनगर २७.९०जालना २९.७६अमरावती ११.२९बुलडाणा ४४.१०यवतमाळ ५०.५५नाशिक ३६.८०धुळे २४.५७नंदूरबार २१.५५पुणे २४.८५सोलापूर २३.५२सातारा ४०सांगली ११.४४जळगाव २६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.