Market Bulletin:मका दबावातचदेशातील बाजारात मक्याचा भाव स्थिर आहे. खरिपातील मक्याचे उत्पादन वाढले. उठाव स्थिर आहे. बाजारातील आवक चांगली आहे. त्यामुळे भाव दबावातच आहेत. सरकार हमीभावाने मका खरेदी करत आहे. मात्र त्याची गती खूपच धिमी आहे. सध्या मका महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशात १५०० ते १६०० रुपये सरासरी दराने विकला जात आहे. गुणवत्तेच्या मालाचा भाव १७०० ते १९०० रुपये आहेत. यंदाचा हमीभाव २४०० रुपये आहे. मात्र मका बाजारातील स्थिती पाहता भाव पुढील काही आठवडे तरी मक्याचा भाव २ हजारांच्या खालीच राहू शकतो, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .बटाटा आवक चांगलीराज्यातील बाजारात सध्या बाटाटा आवक चांगली सुरु आहे. राज्यात बटाटा उत्पादन काही मोजक्याच भागांमध्ये होते. जास्त बटाटा पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह उतर राज्यांमधून येत असतो. त्यामुळे राज्यातील मोठ्या बाजारसमित्यांमध्येच बटाटा आवक जास्त दिसते. मुंबई, पुणे, नागपूर अशा बाजारांमध्ये आवक जास्त आहे. तर सध्या बटाटा गुणवत्तेनुसार बाजारात १४०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे. बटाटा आवक पुढील काही आठवडे टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरातही काहीसे चढ उतार वगळता फारसा बदल दिसण्याची शक्यता कमीच आहे, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .Agrowon Podcast: हळदीचे दर टिकून; सोयाबीन स्थिर, बोरांना मागणी, स्ट्राॅबेरी दर तेजीत तर हिरवी मिरची टिकून .शेवग्यातील तेजी वाढलीराज्यातील बाजारात शेवग्याची आवक मर्यादीतच आहे. तर दुसरीकडे शेवग्याला चांगला उठाव आहे. परिणामी शेवग्याच्या दरातील तेजी वाढली आहे. शेवगा मागील काही महिन्यांपासून चांगलाच भाव खात आहे. पण सध्याची आवक खूपच कमी आहे. त्यामुळे आज शेवग्याला सरासरी १५ हजार ते १८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. काही बाजारांमध्ये शेवगा २० हजारांच्याही पुढे विकला जात आहे. शेवग्यातील तेजी आणखी काही आठवडे टिकून राहील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला. .Agrowon Podcast: तिळाला उठाव वाढला; सोयाबीनमधील चढउतार कायम, कापूस दर स्थिर, कारली दर तेजीतच तर गवारला चांगला उठाव.हिरव्या मिरचीला उठावराज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक अद्यापही वाढलेली नाही. आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याचे व्यापारी सांगत आहेत. हिरव्या मिरचीला इतर भाजीपाला दराचाही आधार मिळताना दिसत आहे. सध्या हिरवी मिरची सरासरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. हिरव्या मिरचीची आवक आणखी काही दिवस कमीच राहून दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .वांगी आवक सुधारतेयराज्यातील बाजारात सध्या वांग्याची आवक कमी आहे. तर दुसरीकडे वांग्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे वांग्याचे दर तेजीत आहेत. सध्या राज्यातील बाजारात वांग्याला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ५ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. मुंबई मार्केटला कमाल ६ हजार रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारातही चांगल्या मालाला ७५०० रुपये दर मिळाला आहे. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये सध्याची आवक कमी आहे. पुढील काही दिवस तरी वांग्याची आवक कमी राहून दर टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकार व्यापारी व्यक्त करत आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.