Satara Farmers Payment Delays: माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मका बाजार समितीला विकला होता. मात्र विक्री होऊन तीन महिने उलटले, तरी ११५ शेतकऱ्यांचे तब्बल ७५ लाख चार हजार आठशे रुपये अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे प्रशासकीय दिरंगाईचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे..जिल्ह्यात माण, फलटण तालुक्यांत मका पिकांसाठी दोन हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले होते. यामध्ये फलटण केंद्रावर २१० शेतकऱ्यांना ५६९५ क्विंटल मक्याची खरेदी झाली. फलटण केंद्रात मका विक्री केलेल्या शेतकऱ्यांना एक कोटी ३६ लाख ८९ हजार २०० रुपये मिळाले आहे. माण तालुक्यातील केंद्रावर १३३ शेतकऱ्यांनी तीन हजार ७३२ क्विंटल मका २४०० रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने खरेदी केली होती. याची एकूण रक्कम ८९ लाख ५६ हजार ८०० रुपये झाली होती. नियमानुसार माल जमा केल्यानंतर काही दिवसांतच पैसे मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ १८ शेतकऱ्यांना १४ लाख ५२ हजार रुपयांचे वाटप झाले आहे. उर्वरित ११६ शेतकऱ्यांचे ७५ लाख चार हजार ८०० रुपये अद्याप शासनस्तरावर रखडले आहेत. .Maize Prices Crash: मक्याचा दर हमीभावाच्या खाली, तेलंगणातील शेतकरी अडचणीत, सरकारकडे मदतीची मागणी.अनेक शेतकऱ्यांनी मक्याचे पैसे हाती येताच विकास सोसायट्यांचे कर्ज फेडण्याचे नियोजन केले होते. ३१ मार्चपूर्वी कर्ज भरले असते, तर शेतकऱ्यांना व्याजात सवलतीचा फायदा मिळाला असता. मात्र रक्कम रखडल्याने रकमेचे वाढीव व्याज भरावे लागणार आहे. एका केंद्रावर पैसे मिळतात व दुसऱ्या केंद्रावर शेतकऱ्यांना हक्काच्या पैशाची वाट पाहण्याची वेळ आली आहे. .Maize Procurement Closed: वाढीव उद्दिष्टाअभावी हमीभावाने मका खरेदी बंद.याबाबत विचारणा केली असता, आम्ही सर्व प्रक्रिया ३१ मार्चपूर्वीच पूर्ण करून माहिती सातारा येथील मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयाला पाठवली आहे, असे सांगण्यात आले. मार्केटिंग फेडरेशननेही ही माहिती मुंबईतील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवल्याचे सांगितले आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून निधी प्राप्त होताच रक्कम वर्ग केली जाईल, अशी माहिती देण्यात आली.. शेतकऱ्यांमध्ये असंतोषशासकीय योजनेवर विश्वास ठेवून हमीभाव केंद्रावर माल विकला ही आमची चूक झाली का, असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. एकीकडे नैसर्गिक संकट आणि दुसरीकडे हक्काच्या पैशांसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.