Jalgaon News : खानदेशात मक्याची लागवड यंदा वाढली. पीकस्थिती बरी आहे. अनेक भागांत पीक मळणीवर येत असून, काही शेतकऱ्यांनी कापणीदेखील सुरू केली आहे. मक्याची लागवड खानदेशात सतत वाढत आहे. मागील वर्षी जळगाव जिल्ह्यात सुमारे ७५ हजार हेक्टरवर मका पीक होते. .यंदा जळगाव जिल्ह्यात मक्याची ९८ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. खानदेशात सुमारे दीड लाख हेक्टरवर मका पीक आहे. यंदा पाऊस वेळेत आला. जूनमध्ये नंदुरबार वगळता धुळे, जळगावात सरासरी पाऊसमान होते. जळगाव जिल्ह्यात जूनमध्ये एकूण १२४ मिलिमीटर पाऊस झाला होता. पेरण्या वेळेत झाल्या..अनेकांनी मात्र कापूस लागवड टाळली. कापूस लागवडीत घट झाली. कापसाऐवजी अनेकांनी मक्याची लागवड केली. मक्याची पेरणी वेळेत झाल्याने पीक बऱ्यापैकी होते. त्यावर पाऊसही आला. .Maize Cultivation: अमरावती जिल्ह्यात मका पेरणीत २१० टक्क्यांनी वाढ.जुलैच्या शेवटच्या १० दिवसांत व ऑगस्टच्या मध्यापर्यंत पाऊस नव्हता. या कालावधीत हलक्या व मध्यम क्षेत्रातील मका पिकास फटका बसला. अनेकांनी किंवा चोपडा, यावल, धरणगाव भागांत शेतकऱ्यांनी सिंचन करून मका पीक वाचविले..ढगाळ, पावसाळी वातावरणामुळे भीतीमका पिकाची कापणी काही भागात सुरू झाली आहे. चोपडा तालुक्यातील वर्डी, मंगरूळ शिवारात काही शेतकऱ्यांनी मका कापणी सुरू केली आहे. कापणीनंतर मका कणसे वाळण्यासाठी नीरभ्र वातावरण हवे आहे. पण ढगाळ व पावसाळी वातावरण आहे..यामुळे नुकसानीचीही भीती आहे. पीक मळणीवर आले आहे, पण पावसाचा अंदाज काही संस्थांनी व्यक्त केला आहे. यामुळे शेतकरी मका कापणी टाळत आहेत. कोरडे, सूर्यप्रकाशित वातावरण राहिल्यास पुढील आठवड्यात कापणी, मळणीस वेग येऊ शकतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..Maize Cultivation: अहिल्यानगरला मक्याचे क्षेत्र तेरा हजार हेक्टरने वाढले.अळीची समस्यामका पिकात यंदाही अमेरिकन लष्करी अळीची समस्या होती. ही समस्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना दोन वेळेत फवारणी घ्यावी लागली. यासाठी एकरी दोन हजार रुपये खर्च आला. ऑगस्टच्या मध्यानंतर पाऊस आला. यात अनेक भागांत मका पीक वाचले. .पीकवाढ बऱ्यापैकी झाली. मका निसवल्यानंतर पाऊस आल्याने पीकवाढ झाली. दाणेही भरले. शेतकऱ्यांनी या कालावधीत खतेही पिकास दिली. यामुळे पीक बऱ्यापैकी आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागवड केलेले मका पीक पक्व झाले आहे. यात काही शेतकऱ्यांनी कमी कालावधीच्या मका वाणांना पसंती दिली आहे. पीक मळणीवर आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.