Nagpur News: अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर या चारही महानगरपालिकांमध्ये भाजप–शिवसेना महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला. लवकरच जागावाटप जाहीर केले जाईल, अशी माहिती महसूलमंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली..भारतीय जनता पार्टी–महायुतीची येथे नुकतीच बैठक झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या चारही महानगरपालिकांमध्ये भाजप–शिवसेना महायुती संदर्भात महत्त्वाची बैठक झाली असून, एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे. बैठकीस शिवसेनेकडून उद्योग मंत्री उदय सामंत, संजय राठोड, आशिष जयस्वाल यांच्यासह अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील समन्वयाची जबाबदारी असलेले सर्व शिवसेना नेते उपस्थित होते. बैठकीत चारही महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवण्यावर सर्वानुमते निर्णय झाला..Municipal Election: महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान.बावनकुळे यांनी सांगितले की, अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत येण्याचे संकेत आहेत. अमरावतीत आमदार रवी राणा यांचा स्वाभिमानी पक्ष महायुतीसोबत येणार असून, चंद्रपूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये सध्या भाजप–शिवसेना युतीचा निर्णय झाला असून राष्ट्रवादीबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र चारही ठिकाणी महायुती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..Municipal Elections : महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर जाणार; तब्बल २३ महापालिकांवर प्रशासकीय राजवट.चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक माजी मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून, हंसराज अहीर यांची प्रमुख भूमिका असेल. या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून चैनसुख संचेती, प्रभारी अशोक नेते आणि निवडणूक प्रमुख किशोर जोरगेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समन्वयातून उमेदवारांची निवड करण्यात आली असून, चंद्रपूरमधील जागावाटप पूर्ण झाले आहे. उद्या किंवा परवापर्यंत उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले..सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, त्यांच्या पाठीशी केंद्रीय व राज्य भाजप नेतृत्व, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे उभे आहेत. सुधीर मुनगंटीवार हे सक्षम नेते असून त्यांना कोणीही डावलू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले. महानगरपालिका निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त करत बावनकुळे म्हणाले की, मागील काही नगरपालिका निवडणुकांमध्ये काही ठिकाणी अपेक्षित यश मिळाले नसले तरी, यावेळी महानगरपालिकांमध्ये महायुतीला चांगले यश मिळेल. चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसावा आणि भाजपचे सरकार यावे यासाठी प्रयत्न सुरू असून जनता महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.