Sangli News: सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीला सोमवारी (ता. ९) सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली. जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेसाठी आवश्यक ३१ जागा आवश्यक आहेत. महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या आहेत. तर महायुतीने ३१ जागा जिंकल्या आहेत. मात्र महायुतीमधील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट भाजप सोबत जाणार की महाविकास आघाडीसोबत यावर सत्तेची गणिते अवलंबून आहेत..मतमोजणी सुरू झाल्यापासून कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हे दिसत नव्हती. मात्र दुपारनंतर निकालाचा कल हा महाविकास आघाडीकडे गेला असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला १८, काँग्रेसला ११ आणि शिवसेना (उबाठा) गटाला एक जागा अशी एकूण ३० जागा आघाडीवर आहेत. जिल्हा परिषदेमध्ये सत्ता भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच जनसुराज्य व रयत क्रांती संघटना हे एकत्र येऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी असे समीकरण करावे लागणार असल्याचे चित्र आहे..Local Body Results: परभणी महानगरपालिका निवडणुकीत उबाठा, कॉंग्रेस आघाडीला बहुमत.जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने ३२ लढवल्या त्यांपैकी १८ जागा जिंकल्या असून सर्वांत मोठा पक्ष ठरण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा परिषदेसाठी ६१ जागांसाठी २११ उमेदवार, तर पंचायत समितीच्या १२२ जागांसाठी ३४० उमेदवार निवडणूक रिंगणात होते..Local Body Results: सलग चौथ्यांदा नागपूरचा गड भाजपने राखला.जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने ३२ लढवल्या त्यांपैकी १९ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने २५ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ११ जागा जिंकल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एक जिंकली..भाजपने ५० जागा लढवल्या होत्या त्यापैकी १६ जागांवर विजयी मिळवला आहे. तर शिवसेना (शिंदे गट) पक्षाने ७ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३१ जागांपैकी ५ जागा जिंकता आल्या. जनसुराज्य आणि रयत क्रांती संघटना प्रत्येकी एक जागा जिंकली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.