'मला २ तारखेपर्यंत युती टिकायची आहे', रवींद्र चव्हाण यांचे विधाननिलेश राणे यांचा भाजपवर पैसे वाटल्याचा आरोपहे खोटे असल्याची चव्हाण यांची प्रतिक्रिया.Ravindra Chavan statement On Mahayuti: स्थानिक स्वराज्य संस्थ्या निवडणुकीदरम्यान महायुतीत धुसफूस सुरुच आहे. याच दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी, 'मला २ तारखेपर्यंत युती टिकायची आहे' असे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane Sting Operation) यांनी चव्हाणांवर पैसे वाटल्याचा आरोप केला. हे खोटे असून मी नंतर यावर उत्तर देईन, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. चव्हाण यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. २ तारखेनंतर काय होईल? युती टिकेल की नाही, यावरुन तर्कवितर्क लढवले जात आहेत. .रवींद्र चव्हाण आज नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया दिली आहे. .फोडाफोडीच्या राजकारणावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. महायुतीत भाजप आणि शिंदेंच्या सेनेत एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्यावरुन वाद निर्माण झाला. यावरुन अमित शहांची भेट घेतल्यानंतर शिंदे यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश दिला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला भाजपमध्ये घ्यायचे नाही आणि भाजपच्या पदाधिकाऱ्याचा शिवसेनेत प्रवेश द्यायचा नाही, असे आदेश शिंदे यांनी दिल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले होते..Kolhapur Politics: कोल्हापुरात राजकीय कुस्ती! त्यांनी 'बात दूर दूर तक' न्यावी, मी त्यासाठी तयार, मंडलिकांचं मुश्रीफांना आव्हान.निलेश राणे यांचे स्टिंग ऑपरेशनआता नुकतेच निलेश राणे यांनी मालवणमधील एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात जाऊन स्टिंग ऑपरेशन केले. त्या घरात पैशांची एक बॅग आढळून आल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला. हे स्टिंग ऑपरेशन त्यांनी सोशल मीडियावर लाईव्ह दाखवले..Maharashtra Politics: मुंबईत महायुती एकत्र लढणार; किंतु परंतु नाही, बावनकुळेंनी स्पष्टचं संगितलं.'बेडरुममध्ये जाऊन स्टिंग ऑपेरशन करण्याचा अधिकार आहे का? बावनकुळेंचा सवाल या घटनेवर भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''अशा प्रकरणात पोलिसांचा तपास महत्त्वाचा असतो. निवडणूक आयोगही या काळात हस्तक्षेप करते. हे कशामुळे पैसे आले? कुठून आले? कशाकरिता पैसे आले? बेडरुममध्ये पैसे ठेवले; ते कोणत्या व्यवहारातून, प्रॉपर्टीतून आले का?. निवडणुकीत पैसे वाटताना कुणी पकडले?, याकडे निवडणूक आयोग लक्ष देते. याचा नियमाने तपास झाला पाहिजे. पोलिसही लक्ष घालतील. चुकीच्या पद्धतीने काही झाले असेल तर पोलिस, निवडणूक आयोग कारवाई करतील. पण अशा पद्धतीने एखाद्याच्या बेडरुममध्ये जाऊन स्टिंग ऑपेरशन करण्याचा अधिकार आहे का?. कारण बेडरुममध्ये जाऊन व्हिडिओ शुटिंग करणे नियमाच्या बाहेर आहे.'' असे बावनकुळे यांनी म्हणत निलेश राणे यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.