MSEDCL Customer Service: महावितरणने ग्राहक सेवेत आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आपल्या विविध सुविधा आता थेट ‘व्हॉट्सॲप’वर उपलब्ध करून दिल्या आहेत. वीजबिलाची माहिती मिळविण्यापासून ते बिल भरणे आणि तक्रार नोंदविण्यापर्यंत सर्व सेवा आता एका क्लिकवर ग्राहकांना सहज उपलब्ध होणार आहेत.राज्यातील वाढत्या डिजिटल वापराच्या पार्श्वभूमीवर ग्राहक ज्या माध्यमांचा नियमित वापर करतात, त्याच माध्यमावर सेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम आहे. ‘व्यवसाय सुलभता’ या संकल्पनेनुसार महावितरणने ग्राहकाभिमुख सेवा अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे..Mahavistar App: महाविस्तार ॲप वापरण्यात अकोले खुर्द राज्यात टॉप.राज्यात महावितरणचे सुमारे ३ कोटी १२ लाखांहून अधिक वीजग्राहक असून, पुणे परिमंडलातच सुमारे ३९ लाख ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांसाठी १३ मार्चपासून ही व्हॉट्सॲप सेवा सुरू करण्यात आली आहे. पूर्वी वीजबिल व पावत्या जतन करण्यासाठी कागदी फाईल्सचा वापर केला जात असे. मात्र, गेल्या काही वर्षांत मोबाईल ॲप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन सेवा सुरू झाल्याने ग्राहकांचा कल डिजिटल सेवांकडे वाढला आहे. आता या सेवांचा विस्तार व्हॉट्सॲपवर केल्याने ग्राहकांना आणखी सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे. महावितरणने ग्राहकांना या नव्या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे..Mahavitran Chatbot Service : ‘महावितरण’ची ग्राहकांसाठी २४ तास ‘चॅटबॉट’ सेवा.‘ब्ल्यू टीक’ असल्याची खात्री करा’महावितरणकडून व्हॉट्सॲप अपडेट्सकरिता ९१६७७७७७९१ हा क्रमांक अधिकृतपणे वापरला आहे. ग्राहकांनी या नंबरला ‘हाय’ संदेश टाइप करून त्यानंतर आपल्या पसंतीची भाषा (मराठी, हिंदी किंवा इंग्रजी) निवडून हवी असलेली सेवा निवडावी. महावितरणने हा क्रमांक व्हेरीफाय केलेला आहे. त्याची खात्री करण्यासाठी कंपनीच्या नावापुढे ‘ब्ल्यू टिक’ असल्याची खात्री करावी. तसेच कंपनीचे संकेतस्थळ, ग्राहक तक्रारीसाठीचा ईमेल आदी माहितीही ‘बायो’मध्ये दिली आहे..वसुली करतेवेळी वीजबिल मिळाले नाही, मिळाल्यावर भरतो अशा सबबी ग्राहक द्यायचे. मात्र आता ग्राहकाला हव्या असणारी वीजबिलाची माहिती महावितरणने आता व्हॉट्सॲपवर उपलब्ध केली आहे. ग्राहकांनी आता पेपरलेसकडे वाटचाल करावी. छापील वीजबिलाऐवजी डिजीटल सेवांवर भर द्यावा.- सुनील काकडे, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.