Mumbai News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने प्रत्येक पक्षाचा एक समन्वयक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जाहीर झालेल्या निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जाणार असून, उमेदवारीबाबत वाद उत्पन्न झाल्यास ही समन्वय समिती तोडगा काढेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. .महाविकास आघाडीच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मंगळवारी (ता. ११) बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अनिल परब, अनिल देसाई यांनी बैठकीची माहिती पत्रकारांना दिली..Local Body Election: मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा; शिवसेना-मनसेसोबत युतीला नकार .जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारीबाबचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यायचा आहे. त्यात वाद निर्माण झाल्यास राज्यस्तरीय समन्वय समिती निर्णय घेईल असे सांगण्यात आले..Bihar Election 2025: राज्यातील लढतीचे ‘केंद्रीय’ पैलू.या समन्वयकांची एक समिती असेल आणि अर्ज भरण्यापूर्वी अथवा नंतर उमेदवारीवरून काही अडचण निर्माण झाली तर ही समिती एकत्र बसून निर्णय घेईल, अशी माहिती श्री. सपकाळ यांनी दिली..श्री. सपकाळ म्हणाले, ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती वा आघाडी करण्याचे अधिकार सर्वच पक्षाने स्थानिक पातळीवर दिले आहेत. परंतु भाजपविरोधात लढण्यासाठी समन्वय असावा.’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.