Education Reform: क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची द्विशताब्दी जयंती वर्ष ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत साजरे करण्यात येणार आहे. यानिमित्त त्यांचे कार्य, विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे नेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच त्यांच्या कार्यावर आधारित विविध कार्यक्रमांची वार्षिक दिनदर्शिका बनवून वर्षभर कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्याचे निर्देश त्यांनी बुधवारी (ता.१) दिले..क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी मंत्रालयात आयोजित समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते..Gram Jayanti Festival: ग्रामजयंती महोत्सवास पुतळा स्वच्छता उपक्रमाने प्रारंभ.ते म्हणाले, की या समितीमधील संलग्नित विभागाने किमान दोन ते तीन कार्यक्रमांचे आयोजन करावे. अशा प्रेरक कार्यक्रमांचे नियोजन १५ एप्रिलपर्यंत देण्यात यावे. महात्मा जोतिराव फुले यांचे मूळ गाव असलेल्या खानवडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील त्यांच्या स्मृती जपणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करण्यात आला आहे..Tararani Festival: कोल्हापुरात ताराराणी महोत्सवास प्रारंभ.महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित साहित्य संपदेचा बहुभाषेत अनुवाद झाला पाहिजे. जेणेकरून संबंधित भाषिक नागरिकांना त्यांच्या भाषेत साहित्य उपलब्ध होईल. शालेय शिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये खासगी शाळांनाही सहभागी करून घ्यावे. सर्व सूचनांचे एकत्रीकरण करून त्यावर आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही केल्या..या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे आदी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.