Jalgaon News: ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी ई-केवायसी माध्यमातून ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे अनेक लाडक्या बहिणींची होळपळ थांबणार आहे. त्याबाबतचे आदेश आज राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अवर सचिव प्र. वि. कुलकर्णी यांनी काढले आहेत..लाभार्थी महिलांची सखोल तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने २० जानेवारी २०२६ अन्वये कळविले आहे. त्यानुसार आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांकडून तपासणी होणार आहे..'Majhi Ladki Bahin' Scheme : लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा तर मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन.‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी इ-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तथापि, ही प्रक्रिया पूर्ण करताना ‘लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे, याबाबतचा पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे,, अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाइन इ-केवायसीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी ३१ मार्च २०२६ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. लाभार्थी बहिणींनी इ-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला गेला..'Majhi Ladki Bahin' Scheme : सर्वोच्च न्यायालयाने ताशोरे ओढले नाहीत; महसूल विभागाचा खुलासा .त्यामुळे योजनेतील निकषाच्या अनुषंगाने या लाभार्थी महिलांची सखोल तपासणी करुन लाभार्थ्यांच्या पात्रता/अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी करण्याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना शासन पत्र २० जानेवारी २०२६ अन्वये कळविण्यात आले होते..मागणीचा रेटा अन् निर्णयतथापि, लाभार्थ्यांची जलदगतीने पडताळणी करण्यासाठी ऑनलाइन इ-केवायसीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्यांकडून व क्षेत्रिय कार्यालयाकडून होत आहे. त्यानुषंगाने ऑनलाइन इ-केवायसीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.