Maharashtra Winter Session Nagpur 2025: भाकड जनावरांचा (Unproductive Cattle) आणि गोरक्षणाच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देण्याऱ्या टोळ्यांचा मुद्दा आज विधानसभेत चांगलाच गाजला. भाकड जनावरे गोरक्षक शेतकऱ्यांना विकू देत नाही. त्यामुळे भाकड गोवंशासाठी शेतकऱ्यांना थेट मदत करा. तसेच गोरक्षणाच्या नावाखाली काही बोगस टोळ्या शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करत आहेत त्यावरही उपाययोजना करा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना अनुदान देणे शक्य नाही असे सांगितले तर पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी बोगस टोळ्यांवर कारवाईचा इशारा दिला. .गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांना भोकड जनावरांची विक्री करणे कठीण झाले आहे. गोरक्षणाच्या नावाखाली काही टोळ्या जनावरांची वाहतूक करताना अडथळे आणून शेतकऱ्यांकडून पैशांची वसुली करतात, अशा तक्रारी राज्यभरातून शेतकरी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अशी भाकड जनावरे सांभाळावी लागत आहेत, हा मुद्दा विजय वडेट्टीवार यांनी आज (ता.१४) विधानसभेत मांडला. .Unproductive Cattle : भाकड पशुधन सांभाळणे आवाक्याबाहेर.राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी भाकड जनावरांबाबत सरकारची भूमिका अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगितले. “कायद्याचा गैरफायदा उचलणाऱ्या ज्या टोळ्या आहेत. त्यांच्याबाबत आम्ही संवेदनशील नाही. आम्ही त्यांच्यावर वेळोवेळी कारवाया केल्या आहेत. शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा माझ्याकडे आले होते. शेतकरी स्वतःच्या जनावराची वाहतूक करत असेल तर अशा टोळ्यांना पाठीशी घातले जाणार नाही,” असे मुंडे यांनी सांगितले. .भाकड जनावरे पाळणे शेतकऱ्याला कठीण होतं. आमचे एकमेव राज्य आहे जे गोरक्षणासाठी मोठे अनुदान देत आहे. शेतकऱ्यांना कसे सहकार्य करायचे; त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे मुंडे यांनी नमूद केले. त्यांनी यावेळी निवृत्त न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या एका समितीच्या अभ्यासाचा संदर्भ दिला. केवळ दूध देणारे जनावर उपयोगाचे असते असे नाही. गोवंशाचे शेण, गोमुत्र याचा शेतीवर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे त्यांना वाचवणे, पालनपोषण करणे जरुरी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. .Livestock Management : भाकड जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांसाठी झाले जिकीरीचे? .विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाकड जनावरांसाठी काय उपाययोजना आहेत. एक तर ते विकू दिले जात नाही. त्यासाठी भाकड जनावारांसाठी निधी वाढवून घ्या. या जनावरांची किंमत ठरवा. त्याचा मोबदला शेतकऱ्यांना द्या म्हणजे प्रश्न सुटेल. गोहत्येसाठी हे जनावरे जातात, हे थांबवता येईल. एका १७ वर्षांच्या पोरानं आत्महत्या केली. त्याची स्वतःची जनावरे आहेत. त्याला पकडून मारहाण केली. आण त्याची बदनामी केली. हे खूप गंभीर आहे. गोरक्षणामध्ये त्या जनावाराला ठेवल्यानंतर त्याला योग्य मोबादला मिळेल. त्याबाबतचा निर्णय घ्या, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. .भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार, यांनी महाराष्ट्र गोवंशहत्या बंदी कायद्याच सुधारणा करण्याचे गरज असल्याचे नमूद केले. भाकड गायी, देशी गोवंश यांच्यासाठी शासकीय जागेवर कुरण विकसित करण्याचा कालबद्द कार्यक्रम करता येऊ शकतो. १९६१ मध्ये जनावरांची संख्या किती होती? आज किती आहे? या आधावर चाऱ्याचे नियोजन करण्यासाठी कार्यवाही करणार आहे का? असे सवाल त्यांनी केले. गोवंश रक्षणासाठी २२२ कोटी रक्कम असल्याचेही त्यांनी सांगितले..श्रीगोंदा येथील भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनीही यावरून काही प्रश्न उपस्थित केले. देशी गायींसोबत बैलांचेही हाल होतात. ती पकडली जातात, त्यांना पांझरपोळमध्ये नेले जाते. पण तिथे अधिक क्षमता नसल्याने तेथे ती जनावरे मरण पावतात. हे दुर्दैवी आहे. यावर मार्ग काढायला हवा, असे पाचपुते म्हणाले..यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उत्तर दिले. भाकड जनावरांना सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना मदत देणे शक्य नाही. राज्यात १ कोटी शेतकरी आहेत. शेतकरी विविध प्रकारची जनावरे सांभाळतात. पण अनुदान फक्त गोवंशाला दिले जाते. शेतकऱ्यांकडे किती गोवंश आहे? हे कसे ठरवणार? तसेच राज्याची तिजोरी ओसंडून वाहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान देणे शक्य नाही केवळ गोशाळांना अनुदान देणे शक्य आहे, असे अजित पवार यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.