Dam Storage Report: जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण ३,०२९ प्रकल्पांची एकूण १,४२२.१२ टीएमसी क्षमता असून, त्यापैकी ८२७.१० टीएमसी (२३,४२७.८४ दशलक्ष घनमीटर) म्हणजेच ५७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हा साठा गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ६५.४७ टक्क्यांच्या तुलनेत सुमारे आठ टक्क्यांनी कमी आहे. मात्र घाटमाथा आणि कोकणात सुरू असलेल्या पावसामुळे आगामी काळात जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे..यंदा जूनमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणांमध्ये अपेक्षित आवक झाली नव्हती. मात्र जुलैच्या सुरुवातीपासून ९ जुलैपर्यंत आणि त्यानंतर २० जुलैपासून राज्यातील विविध भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांत ४३१.९९ टीएमसी पाण्याची भर पडली. परिणामी अनेक धरणांतील साठा ५० टक्क्यांहून अधिक झाला असून, काही धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागली आहेत..Jayakwadi Dam Water Storage: जायकवाडीत झपाट्याने वाढतोय पाणीसाठा.यंदा ३१ मेपर्यंत राज्यातील धरणांमध्ये केवळ ३९५ टीएमसी (२७ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे धरणक्षेत्रात जोरदार पावसाची आवश्यकता निर्माण झाली होती. जूनअखेरपासून पावसाचा जोर वाढल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला.गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यातील धरणांमध्ये ६५.४७ टक्के पाणीसाठा होता. यंदा कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत अतिवृष्टी झाली असली, तरी काही धरणक्षेत्रांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने तेथील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही..कोकणातील बहुतांश धरणे भरलीकोकणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धरणांतील पाणीसाठा ७५ टक्क्यांहून अधिक झाला आहे. ओढे, नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत असून, धरणांमध्ये अजूनही वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. सूर्या-धामणी (कवडास) धरणातून १६५२ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र भातसा आणि अप्पर वैतरणा धरणांतून अद्याप विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही..मध्य महाराष्ट्रातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढघाटमाथ्यावर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील धरणांमध्ये जलसाठा वेगाने वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील १७ धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला असून, चार धरणे पूर्ण भरली आहेत. त्यामुळे भीमा, मुठा, पवना, आरळा, कुकडी, मीना, नीरा, घोड आणि हंगा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नाशिकमधील गंगापूर, दारणा, कडवा, पालखेड, नगरमधील भंडारदरा, देवठाण आणि कोल्हापूरमधील राधानगरी धरणांतूनही विसर्ग सुरू आहे..Radhanagari Dam Water Update: राधानगरी धरण ७३ टक्के भरले.dपूर्व विदर्भात अपेक्षित आवक नाहीपूर्व विदर्भात हलका ते मध्यम पाऊस सुरू असला तरी धरणांमध्ये अद्याप अपेक्षित प्रमाणात पाण्याची आवक झालेली नाही. नागपूर विभागातील गोसीखुर्द वगळता पेंच-तोतलाडोह, इटियाडोह, शिरपूर, वर्धा तसेच अमरावती विभागातील उर्ध्व वर्धा, बेंबळा, अरुणावती, काटेपूर्णा, वान, पेनटाकळी आणि खडकपूर्णा धरणांतील साठा अद्याप कमी आहे. नागपूर विभागातील अवघ्या तीन धरणांमध्येच ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असून, अमरावती विभागातील सर्व धरणांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे..विभागनिहाय धरणांतील पाणीसाठाविभाग - धरणांची संख्या- पाणीसाठा (टीएमसी) - टक्केवारीनागपूर - ३८७ - ८०.४० - ४८अमरावती - २७६ - ९०.५० - ४३छत्रपती संभाजीनगर - ९२९ - १३४.५२ - २७नाशिक - ५३९ - १२७.२१ - ६०पुणे - ७२४ - ३८५.४५ - ७१कोकण - १७४ - १०३.२९ - ७९एकूण- ३,०२९ - ८२७.१० - ५७.घाटमाथ्यावर सर्वाधिक पाऊस (मिलिमीटरमध्ये) :ताम्हिणी ः १७०, भिवपुरी ः १५८, खांड ः १५२, शिरगाव ः १४०, लोणावळा ः १२८, ठाकूरवाडी ः १०६, वळवण ः ११४, वानगाव ः १०९, दावडी ः ११६, भिरा ः १२१.(रविवार (ता.२६) सकाळी आठ वाजेपर्यंत).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.