Maharashtra Urbanisation Crisis: महाराष्ट्राच्या वाढत्या शहरीकरणाचा पेच
Infrastructure Growth: महाराष्ट्रातील वाढते नागरीकरण केवळ शहरांच्या प्रगतीचे लक्षण नसून ते ग्रामीण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींचा आरसा आहे. हे संक्रमण आता एका अशा टप्प्यावर पोहोचले आहे जिथे परतीचे मार्ग बंद झाले आहेत. आगामी दशकात राज्याचा निम्म्याहून अधिक भाग हा पूर्णपणे ‘नागरी’ असेल, हे गृहीत धरूनच आपल्याला भविष्यातील नियोजन करावे लागेल. महाराष्ट्राला आता ‘स्मार्ट सिटी’पेक्षा ‘स्मार्ट व्हिलेज’ आणि ‘रूर्बन’ (Rurban) मॉडेल्सची जास्त गरज आहे.