Crop Damage due to Unseasonal Rain : वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार बीड, लातूर, परभणी, नांदेड, धाराशिव तसेच यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांतील सुमारे ३७ हजार ८५८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण व पंचनामे केले जातील, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे..गहू आणि ज्वारीची पिके आडवी झाली असून काढून ठेवलेला हरभरा भिजल्याने नुकसान वाढले आहे. द्राक्षबागांना मोठा फटका बसला असून भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. आंब्याचा मोहोर झडल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे..Unseasonal Rain: गारपीट, वादळी पावसाचा रब्बी पिकांना तडाखा; तातडीने मदतीची मागणी.नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी आमदारांनी केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकसानग्रस्त भागांत तातडीने सर्वेक्षण व पंचनामे केले जातील, असे सांगितले. .Unseasonal Rain Alert : पूर्व विदर्भात आजही वादळी पावसासाठी पोषक हवामान.तसेच महसूल व कृषी विभागामार्फत अहवाल तयार करून शासनाकडे सादर केला जाणार आहे. ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्यास निधीची मागणी करून मदत वितरित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तर भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनीही शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली..शेतकऱ्यांना पीकविमा मिळेलराज्यात रविवार, सोमवार आणि मंगळवारी काही भागात पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीट झालेली आहे. वादळी पाऊस आणि गारपीटीने पिकांचे नुकसानही झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची भरपाई देखील मिळेल. नुकसान झालेल्या मंडळात पीक कापणी प्रयोगातून त्या पिकाचे उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यानंतर शेतकरी पीकविमा भरपाईसाठी पात्र ठरतील. या पात्र शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे पीकविमा देण्यात येईल, असेही सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.