Pune News : महसूल विभागात कधी सात-बारा उताऱ्यावर चुकीच्या नोंदी होतात; तर कुठे जमिनीचे फेरफार चुकीने घेतले जातात. त्यातूनच उद्भवणारे दावे पिढ्यान् पिढ्या चालतात. या दाव्यांमध्ये दलालांच्या नादी लागून लोकांचे पैसेही वाया जातात. त्यामुळे शासकीय सेवा नेहमी सुलभ व जीवन सुखकर करणाऱ्या हव्यात. त्यामुळे येत्या मेपर्यंत सर्व ११०० शासकीय सेवा ऑनलाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली..महसूल सेवा पंधरवड्याअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातील विविध सेवा प्रकल्पांचा प्रारंभ सोहळा बुधवारी (ता. १७) पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंच येथे झाला. या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, खासदार मेधा कुलकर्णी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, विभागीय महसूल आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते..Land Record: समजून घ्या गाव नमुना.श्री. फडणवीस म्हणाले, ‘केवळ सात-बारा मिळत नाही म्हणून लोक मंत्रालयात येतात. लोकांच्या जीवनात आम्हाला सुलभता आणायची आहे. खरे तर महसूल विभागाच्या सेवा सर्वाधिक आहेत. त्यामुळे महसूल सेवा सुधारली तर शासनदेखील सुधारणार आहे..Land Record : सोलापूर जिल्ह्यातील ४२८१ सातबारे झाले जिवंत .जनतेला सरकारी कार्यालयांमध्ये चकरा माराव्या न लागता घरबसल्या सेवा देण्याचे ध्येय राज्यानेही ठेवले आहे. त्यासाठीच शासनाच्या सर्व सेवा टप्प्याटप्प्यात ऑनलाइन केल्या जाणार आहेत. प्रत्येक सेवेला सेवा हमी कायदा लावला जाईल. त्यामुळे कोणालाही फाइल अडविता येणार नाही.’.श्री. पवार म्हणाले, ‘पाणंद रस्त्यांसाठी लागणाऱ्या मुरुमावर स्वामित्व शुल्क लावले जाणार नाही. राज्यातील सर्व पोलिसांनी ही बाब लक्षात घ्यावी. राज्यातील शेतकऱ्यांना पुरेशी वीज, पाणी व पक्के रस्ता देण्याचे ध्येय मुख्यमंत्र्यांनी ठेवल्याचे श्री. बावनकुळे यांनी स्पष्ट केले..नानांमुळे ‘पाणंद रस्ते’ होईल लोकचळवळ‘सेवा पंधरवडा उपक्रमांमुळे ‘महसूल’च्या सेवा लोकांपर्यंत पोहोचतील व राज्यभर पाणंद रस्ते होतील. त्यातून शेतीचे अर्थकारण वाढेल. नाना पाटेकर यांची ‘नाम’ संस्थाही शासनाबरोबर आल्याने नानांच्या प्रेरणेतून ‘जलसंधारण’प्रमाणेच ‘पाणंद रस्ते’ हीदेखील एक लोकचळवळ बनेल, असा आशावाद श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.