Maharashtra Sugarcane Price Issue: गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या ऊसदराचा प्रश्न आणि गळीत हंगामाची कोंडी फोडण्यासाठी शनिवारी (ता. २४) शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि साखर कारखानदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्यांवर ठोस तोडगा निघू शकला नाही..बैठकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार एकत्र आले होते. त्यांनी एकजूट दाखवली. कारखानदारांच्या वतीने आबिटकर, शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी खासदार संजय मंडलिक यांना अधिकृत प्रतिनिधी म्हणून चर्चेसाठी पाठविण्यात आले होते..Sugarcane Rate: ऊसदरावर तोडगा नाही, पहिली उचल ४,५०० रुपये द्या, राजू शेट्टींची मागणी.बैठकीत प्रामुख्याने साखरेच्या अर्थकारणावर सविस्तर चर्चा झाली. साखरेचे किमान विक्री मूल्य प्रति किलो ५० रुपये करण्यात यावे, यासाठी शेतकरी संघटनांनी सरकारवर दबाव वाढवला आहे. केंद्र सरकारकडून साखरेचे नवीन किमान विक्री मूल्य (एमएसपी) निश्चित केले जाईल आणि सध्या बाजारात असलेले साखरेचे दर या बाबींच्या अधीन राहून कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या बाजूने सकारात्मक निर्णय घ्यावा, यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली..Sugarcane Fair Price: साखर दरातील फरक जातो कुठे : राजू शेट्टी.कारखानदारांना पुढील वर्षभरात साखरेला मिळणारे तेजीचे भाव आणि गतवर्षी झालेली सरासरी विक्री, या सर्व आर्थिक बाबींचा ताळेबंद राजू शेट्टी यांनी यावेळी मांडला..‘‘गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांचा ऊस उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यातच उसाची घटलेली रिकव्हरी (उतारा) आणि वजनात झालेली घट यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहे. या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून साखर कारखानदारांनी यंदाच्या हंगामासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या मागणीनुसार उसाची पहिली उचल अत्यंत घसघशीत जाहीर करावी,’’ अशी आग्रही मागणी राजू शेट्टी यांनी कारखानदारांकडे केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.