Ethanol Price: राज्यातील साखर उद्योगासमोरील अडचणी दूर करण्यासाठी साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) वाढविणे, तसेच इथेनॉलचा दर आणि कोटा वाढविण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत दिली..राज्यात २०० हून अधिक सहकारी आणि खासगी साखर कारखाने कार्यरत आहेत. २०२५-२६ च्या गाळप हंगामात साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असताना केंद्र सरकारने साखर निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या, असा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. आमदार सदाशिव खोत, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, डॉ. परिणय फुके आणि उमा खापरे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात पाटील यांनी साखर निर्यात धोरण हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय असल्याचे स्पष्ट केले..Sugar MSP: साखर उद्योग अडचणीत, साखरेची 'एमएसपी' वाढणार का? सहकारमंत्र्यांचा महत्त्वाचा खुलासा.केंद्र सरकारने १३ मे २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार साखरेच्या निर्यातीवर तत्काळ प्रभावाने ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे. ही बंदी पुढेही कायम राहिल्यास राज्यातील साखर उद्योग, ऊस उत्पादक शेतकरी आणि संबंधित अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची बाबही या प्रश्नातून मांडण्यात आली होती..Sugar MSP: साखरेचा किमान विक्री दर प्रतिक्विंटल ४,३०० रुपये करावा : माजी आमदार मानसिंगराव नाईक.यासंदर्भात पाटील यांनी सांगितले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २४ मार्च २०२६ रोजी राज्यातील साखर उद्योगाच्या अडचणींबाबत बैठक झाली होती. केंद्राच्या अखत्यारीतील विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी राज्याच्या शिष्टमंडळाने केंद्र सरकारशी प्रत्यक्ष चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता. .त्यानुसार फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २७ मे २०२६ रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत सहकारी साखर कारखान्यांसमोरील विविध अडचणी मांडण्यात आल्या असून, प्रत्येक मागणीवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत केंद्रीय सहकारमंत्र्यांनी सहमती दर्शविली आहे, असे पाटील यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.