Someshvarnagar News: राज्य सरकारने पाणंद अथवा शेतरस्ते तयार करून देण्याची योजना आणखी सोपी आणि शेतकरीभिमुख केली आहे. या योजनेत यांत्रिकीकरणाने रस्ते करण्यास परवानगी तर दिलीच आहे, शिवाय रस्त्यासाठी लागणारी माती अथवा मुरूम पूर्णतः रॉयल्टीमुक्त असणार आहे. .शिवाय अडचणीच्या ठिकाणची मोजणी प्रक्रिया अथवा पोलिस बंदोबस्त हेही निःशुल्क असणार आहे. याबाबत महसूल विभाग अॅक्शन मोडवर असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा करून घेण्याची गरज आहे..Panand Road: ...अखेर खुला झाला कुरवलीचा पाणंद रस्ता .यापूर्वी राज्य सरकारने राबविलेली पाणंद रस्ते योजना ‘मनरेगा’अंतर्गत मजुरांकडून राबविली जात होती. मात्र, शेतरस्त्याची प्रचंड गरज पाहून ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद/शेतरस्ते योजना’ सुरू केली असून, आता यांत्रिकीकरणाद्वारे रस्ते केले जाणार आहेत. ही योजना ग्रामपंचात आणि महसूल विभागाच्या समन्वयाने राबविली जाणार आहे..त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांना संपर्क साधणे सोपे जाणार आहे. या योजनेत जमीन मोजणीची आवश्यकता पडल्यास भूमीअभिलेख विभागाकडून तातडीने मोफत मोजणी होणार आहे, तर पोलिस बंदोबस्तही मोफत मिळणार आहे. अतिक्रमणांच्या तक्रारींचा स्वतः तहसीलदारांना निपटारा करावा लागणार आहे. गाव कामगार तलाठ्यांनी स्वतः उभे राहून काम करून घ्यावे लागणार आहे आणि माती-मुरूम उपलब्ध करून द्यावा लागणार आहे..Panand Road: मेहकर, लोणारमधील ७९ शेत पाणंद रस्त्यांसाठी ११ कोटी खर्चास मंजुरी....अशी असणार समितीया योजनेच्या समिती अध्यक्षपदी आमदार, तर सचिवपदी प्रांताधिकारी राहणार आहेत. डीवायएसपी, तहसीदार, गटविकास अधिकारी, भूमिअभिलेख उपअधीक्षक, कृषी अधिकारी, वनाधिकारी, बांधकाम उपअभियंता व पाच प्रगतिशील शेतकरी सदस्य असणार आहेत..ठळक बाबीअतिक्रमण न काढल्यास तहसीलदार लक्ष घालणाररस्ता झाल्यानंतर नोंद होणाररस्ता झाल्यानंतर खोदल्यास फौजदारी कार्यवाहीमाती-मुरूम रॉयल्टी, पोलिस बंदोबस्त, मोजणी मोफतनिधीसाठी स्वतंत्र लेखाशिर्ष उघडण्यास मान्यतासीएसआरमधून निधीसाठी परवानगीखासदार-आमदार निधी मिळणारग्रामपंचायतीचे स्वउत्पन्न, महसुली उत्पन्न अथवा १५ वा वित्त आयोग यातूनही निधी शक्य.जे रस्ते नकाशावर आहेत आणि जे रस्ते वापरात आहेत, पण नकाशावर नाहीत ते या योजनेत समाविष्ट आहेत. तसेच, शेतकऱ्यांची संमती असेल तर नवे शेतरस्तेही निश्चित काढले जाणार. रस्ते झाल्यावर ग्रामरस्त्यांसाठी वेगळी नोंद घेतली जाईल. शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे. यासाठी सरपंच कार्यशाळा घेत आहोत.- वैभव नावडकर, प्रांताधिकारी, बारामती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.