Solar Pump: ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत महाराष्ट्राने गाठला उच्चांक; ‘गिनीज बुक’ मध्ये नोंद
Renewable Energy: राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत महाराष्ट्राने जगाचा विक्रम मोडला आहे. महावितरणने फक्त एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषिपंप बसवून विश्वातील सर्वाधिक सौर पंप बसविण्याचा नवा विक्रम केला.