Pune News: ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या वार्षिक बैठकीत पहिल्या दिवशी राज्य शासनाकडून विविध उद्योगांसमवेत तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. या गुंतवणुकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. .राज्य शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रांतील उद्योगांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ही गुंतवणूक मुंबईसह राज्याच्या रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या भागात पोहोचणार असल्याने तिथे उद्योगवाढीसह मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली..Agriculture Investment: शेतीचा भांडवली खर्च वाढेल.सामंजस्य करारांवरील स्वाक्षरी व करारांच्या आदान-प्रदान प्रसंगी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कीमहाराष्ट्रावरील उद्योग क्षेत्राचा, गुंतवणूकदारांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी महाराष्ट्र सदैव सज्ज आहे. येथे होणाऱ्या करारांवरील पुढील कार्यवाहीबाबत ‘वॉर रूम’च्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल..उद्योजकांना आवश्यक सुविधा वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने मिळाव्यात, याची काळजी घेतली जाईल. दरम्यान, आगामी दोन दिवसांत दावोसमध्ये एआय, क्वांटम कम्प्युटिंग, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, यासह फिनटेक, लॉजिस्टिक्स, इन्फ्रास्ट्रक्चर, तसेच जहाज बांधणी, ईव्ही, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील आणखी काही उद्योग घटकांशीही गुंतवणुकीचे सामंजस्य करार होणार आहेत. त्यादृष्टीने त्यांच्या प्रतिनिधींशी, चर्चेच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत..Agriculture Investment: शेतीचा भांडवली खर्च वाढेल.आजअखेर झालेले महत्त्वपूर्ण सामंजस्य करारएमएमआरडीए-सुमिटोमो रियालिटीगुंतवणूक : सुमारे ८ बिलियन डॉलर्ससंभाव्य रोजगार : ८० हजारएमएमआरडीए-के. रहेजागुंतवणूक : सुमारे १० बिलियन डॉलर्ससंभाव्य रोजगार : १ लाख.एमएमआरडीए-अल्टा कॅपिटल/पंचशीलगुंतवणूक: सुमारे २५ बिलियन डॉलर्ससंभाव्य रोजगार : २ लाख ५० हजारएमएमआरडीए-एसबीजी समूहक्षेत्र : लॉजिस्टिक्सगुंतवणूक : सुमारे २० बिलियन डॉलर्ससंभाव्य रोजगार : ४ लाख ५० हजार.एमएमआरडीए-आयआयएसएम ग्लोबलगुंतवणूक : सुमारे ८ बिलियन डॉलर्ससंभाव्य रोजगार : ८० हजारमहाराष्ट्र सरकार- सुरजागड इस्पातक्षेत्र: स्टीलगुंतवणूक : २० हजार कोटीसंभाव्य रोजगार : ८ हजारठिकाण : गडचिरोली.महाराष्ट्र सरकार-लोढा डेव्हलपर्सक्षेत्र : आयटी, डेटा सेंटर्सगुंतवणूक : १ लाख कोटीसंभाव्य रोजगार : १ लाख ५० हजार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.