Nagpur News: महसूल विभागामधील वसुलीखोरीला चाप लागावा याकरिता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत खामला येथील सह दुय्यम उपनिबंधक कार्यालयात त्यांनी छापेमारी केली. या वेळी एका अधिकाऱ्याच्या कुलूप बंद ड्रॉवरमध्ये मोठी रक्कम सापडल्याची चर्चा आहे. या रकमेबाबत चौकशीचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत..यापूर्वी श्री. बावनकुळे यांनी सावनेर तालुक्यात दुय्यम निबंधक कार्यालयाला आकस्मिक भेट दिली होती. त्या वेळी या कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यानंतर त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याची चांगलीच झाडाझडती घेतली होती. संबंधिताविरोधात कारवाईचे आदेशही देण्यात आले होते..Revenue Minister Chandrashekhar Bawankule: रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी चौपट मोबदला मिळवून देणार.दरम्यान, नागपूर शहरातील खामला भागातील सहदुय्यम उपनिबंधक वर्ग २ कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय कुठलीच नोंदणी केली जात नसल्याच्या तक्रारी होत्या. याची दखल घेऊन श्री. बावनुकळे यांनी थेट या कार्यालयात भेट दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. लपवाछपवीच्या आधीच त्यांना एका अधिकाऱ्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये रोख रक्कम आढळली. या रकमेचा आकडा त्यांनी जाहीर केला नाही. मात्र लाखांच्या घरात ही रक्कम असल्याची चर्चा आहे..Chandrashekhar Bawankule : भाजप सर्वच मुस्लिमांच्या विरोधात नाही ः बावनकुळे .त्यांनी पोलिसांना योग्य तो तपास करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना जर कोणत्याही शासकीय कामासाठी कोणी लाच अथवा इतर कशाची मागणी केली जात असल्यास थेट तक्रार करण्याचे आवाहन श्री. बावनकुळे यांनी केले आहे..राज्यात महसूल विभाग अधिक जबाबदार आणि जनतेसाठी सुलभ करण्यासाठी पुढील काही दिवसांत सर्व उपनिबंधक कार्यालयांवर विशेष तपास मोहिमा राबविण्याचे संकेत त्यांनी दिले. सर्वाधिक भ्रष्ट म्हणून महसूल विभाग ओळखला जातो. त्यातही भूखंड खरेदी-विक्रीच्या नोंदी करणारे दुय्यम निबंधक सर्वाधिक बदनाम आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.