Maharashtra Monsoon Update: राज्यातील बहुतांश भागात ९ जुलैपासून पावसात घट झाली. पावसात खंड पडल्याने शेतकरी चिंतेत होते. पण आठवडाभराच्या विश्रातीनंतर राज्यातील काही भागात पावसाने सुरुवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे..मुंबई वेधशाळेने आज १७ जुलै रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा घाट क्षेत्र, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट क्षेत्र, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया. चंद्रपूर, गडचिरोली आदी जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. .Monsoon Rain Forecast: विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज; राज्यात आजपासून तीन दिवस काही भागात पावसाची शक्यता.रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही आज पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. यामुळे भातरोपांना काही प्रमाणात जीवदान मिळाले. कोकणात पावसाअभावी भाताची पुनर्लागवड करण्याची कामे थांबली आहेत. काही ठिकाणी पुनर्लागवड केलेले भात करपून जाण्यास सुरुवात झाली होती. यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली होती. पण आता पावसाने सुरुवात केली आहे. तरीही शेतकरी चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत..Rain Alert: विजांसह वादळी पावसाचा इशारा.कुठे कुठे पावसाची नोंद?गेल्या २४ तासांत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सर्वाधिक ४४ मिमी तर पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात २५ मिमी, ठाणे जिल्ह्याच्या उल्हासनगरमध्ये २५ मिमी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात ६३ मिमी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून तालुक्यात २१ मिमी पावसाची नोंद झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात ४५ मिमी पाऊस पडला. .गडचिरोली जिल्ह्यात पावसाने शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जळकू भागात जोरदार पाऊस झाला..गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांतील पाणीसाठा ४९.७९ टक्के झाला आहे. गेल्या २४ तासात जलाशयातील पाणीसाठ्यात ०.१४ टक्के वाढ झाली असल्याचे मुंबई महानगरपालिकेने म्हटले आहे. .आज व उद्या कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी आणि उद्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.