आज आपण कापूस, सोयाबीन, बेदाणा, शेवगा आणि स्ट्राॅबेरी बाजाराची माहिती घेणार आहोत.सोयाबीनमध्ये सुधारणादेशातील बाजारात आज सोयाबीनच्या भावात काहिशी सुधारणा दिसून आली आहे. सोयाबीनला उठाव मिळत असल्याचा आधार दराला मिळत आहे. सध्या देशात तेलाला मागणी आहे. आयातीवर परिणाम होत असल्याने देशातील मालाकडे ओढा वाढला आहे. सोयातेलासोबत पेंडेला उठाव कायम आहे. त्यामुळे सोयाबीन पुन्हा हमीभाववर पोचले आहे. आज बाजारात सोयाबीन ५ हजार २०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान विकले गेले आहे. तर प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ५ हजार ६५० ते ५ हजार ८५० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीनचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .शेवगा नरमलाराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून शेवग्याची आवक वाढल्यानंतर दरात नरमाई आली आहे. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये मागील ३ आठवड्यांपासून आवक सुधारली आहे. यामुळे विक्रमी दरापासून शेवगा खूपच कमी झाला आहे. मागील महिन्यात शेवगा ८ हजारांपेक्षा अधिक दरात विकला जात होता. पण सध्या शेवग्याला २५०० ते ४ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. शेवग्याची बाजारातील आवक आणखी काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत..Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा, कापसाला आधार, आल्याचे भाव टिकून, मक्याची आवक स्थिर, भेंडीची आवक स्थिर.कापूस स्थिरदेशातील बाजारात आज कापसाचा भाव स्थिरावला होता. सीसीआयच्या कापूस विक्रीचेही भाव स्थिरावले आहेत. सध्या देशातून कापूस आणि सूत निर्यातीला उठाव मिळत आहे. देशातील बाजारात सुतगिरण्या, व्यापारी आणि निर्यातदार सीसीआयच्या कापसाची चांगली खरेदी करत आहेत. रोज दीड लाखांच्या दरम्यान गाठी विकल्या जात आहेत. तर खुल्या बाजारात सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ४०० ते ८ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. कापसाचे भाव पुढील काही दिवस कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: केळीचा भाव टिकून; कापूस स्थिरावला, कांदा दबावात, मिरचीला उठाव टिकून तर बेदाण्याला उठाव.बेदाणा तेजीतदेशातील बाजारात सध्या बेदाण्याचा भाव तेजीत आहे. गेले महिनाभर बेदाण्याला रमजामुळे चांगला आधार मिळाला. मागणी वाढल्यामुळे दरातही वाढ झाली आहे. तसेच लग्न सराईचीही मागणी आहे. निर्यातीवर काहीसा परिणाम होत असला तरी देशातील मागणीचा आधार कायम आहे. सध्या बाजारात बेदाण्याला गुणवत्तेप्रमाणे प्रतिकिलो १५० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. बेदण्याला पुढील ३ महीने चांगली मागणी राहण्याचा अंदाज आहे. तर बेदण्याची आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज बेदाणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .स्ट्राॅबेरीला मागणी राज्यातली बाजारात मागील काही दिवसांपासून स्ट्राॅबेरीची आवक कमी झाली आहे. तर वाढत्या उन्हामुळे स्ट्राॅबेरीला मागणी चांगली आहे. बदलत्या वातावरणाचा स्ट्राॅबेरी पिकाला फटका बसत आहे. तर काही भागात मागील २ दिवसांमध्ये झालेल्या पावसाचाही दणका बसला आहे. सध्या स्ट्राॅबेरी प्रतिकिलो १०० ते २०० रुपयाने विकली जात आहे. बाजारातील आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर टिकून राहण्यास मदत होईल, असा अंदाज आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.