Pune News: राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच पावसाला पोषक वातावरणाही होत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात शुक्रवारपासून पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. .पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी तसेच गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा येलो अलर्ट अलर्ट देण्यात आला आहे..Unseasonal Rain: नांदेडला अवकाळीचा २९८ हेक्टरला फटका.मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात शुक्रावारी, शनिवारी आणि रविवारी काही ठिकाणी ढगांच्या गडगडटासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी, तसेच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड..Unseasonal Rain: नवेगावबांधला अवकाळी पावसाचा फटका .हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही शनिवारी आणि रविवारी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. .राज्यातील काही भागात आज उष्णतेच्या लाटेचाही अंदाज देण्यात आला आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.