फोडाफोडीच्या राजकारणावरुन भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत तणाव विशेषतः भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'वरुन शिवसेनेत प्रचंड नाराजीउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवानाअमित शहांची भेट घेऊन चर्चा करणार.Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान राजकीय हालचाली वेगाने सुरु आहेत. यातच फोडाफोडीच्या राजकारणावरुन भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे. विशेषतः भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'वरुन (BJP Operation Lotus) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असून ते दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ते आज सायंकाळी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे समजते..एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण- डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात शिंदे समर्थक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याने वादाची ठिणगी पडली आहे. काल ही नाराजी स्पष्टपणे दिसून आली होती. या पार्श्वभूमीवर शिंदे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली होती. तर आज त्यांची दिल्ली वारी होत आहे. हे विशेष आहे..Maharashtra Politics: शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला मारली दांडी, नाराजीनाट्यावर फडणवीसांनी खडेबोल सुनावले .सध्याच्या फोडाफोडीच्या राजकाणावरुन शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. स्थानिक पातळीवर पक्ष कमकुवत होत असल्याने शिवसेना सतर्क झाली आहे. काल मंगळवारी ही नाराजी पाहायला मिळाली. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता. केवळ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले होते. तसेच शिंदे आणि त्यांचे मंत्री मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही घेऊनही गेले होते. शिवसेना नेते आणि नगरसेवकांना मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश दिला जात असल्याबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. .Kolhapur Politics: ‘अदृश्य शक्तीचा हात...; एकत्र आलोय, कायम एकत्र राहण्यासाठी’; कट्टर विरोधक मुश्रीफ-घाटगेंची युती.दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांच्यासमोर शिवसेनेच्या मंत्र्यांना झापल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावेळी उलट मुख्यमंत्री फडणवीस यांनी, तुमच्या गटाकडून कसे प्रवेश दिले जात आहेत? याची यादीच वाचून दाखवली. .स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीदरम्यान महायुतीत जी काही फोडाफोडी सुरु आहे; त्यावरुन शिंदे प्रचंड नाराज आहेत. उद्या बिहार मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे. भाजप शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी शिंदे दिल्लीला रवाना झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. ते अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर त्यांची भूमिका जाहीर करणार असल्याचे समजते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.