Chandrapur News : राज्यात २० नवीन जिल्हे आणि ८१ नवीन तालुके निर्मिती करण्याचा प्रस्ताव सरकारकडे आहे. जनगणना, भौगोलिक स्थिती आणि सीमांकनाच्या आधारे हा निर्णय घेतल्या जाईल. जिथे गरज आहे तिथेच जिल्हा आणि तालुक्यांची निर्मिती केली जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार (ता. २०) दिली..श्री. बावनकुळे शनिवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात सर्वाधिक वाळूचोरी सुरू आहेत. .Chandrashekhar Bawankule : भाजप सर्वच मुस्लिमांच्या विरोधात नाही ः बावनकुळे .तशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तालुक्यातून दररोज तीन हजार ट्रक वाळू तस्करी सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तालुक्यातील अनेक वाळूघाटांवर कॅमेरे नाही. ट्रकांची नोंदणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांना कारवाईचे अधिकार दिले आहे. वाळूतस्करांवर एमपीडीए कायद्याअन्वये कारवाई केली जाईल. .चंद्रपूर महापालिका क्षेत्रातील शासकीय जागेवर ५५ झोपडपट्टीधारकांची घरे कायदेशीररित्या नियमित केली जाणार आहेत. सर्वांसाठी घरे या योजनेत प्रत्येकाला अडीच लाख रुपये केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. नकाशा योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला घरपोच सनद घरी पोहोचवून दिली जाणार आहे. जिवंत सात-बारा योजनेच्या माध्यमातून मृताच्या वारसांना सात-बारा दिला जाणार आहे..ते म्हणाले, की चंद्रपूर जिल्ह्यात फ्लॅटचे रजिस्ट्रेशन होत नाही. ही बाब गंभीर आहे. आदिवासींच्या जमिनी भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात कायदा करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, सेवा पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. .Revenue Minister Chandrashekhar Bawankule: रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी चौपट मोबदला मिळवून देणार.शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांचे मॅपिंग केले जाणार असून त्यांना क्रमांक दिले जाणार आहे. अतिक्रमण होऊ नये यासाठी अशा प्रकारे मॅपिंग करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून या अभियानाची सुरुवात झाल्याची माहिती त्यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती राहणार आहे. निवडणुका लागल्याशिवाय तिकीट वाटपाचा फॉर्म्युला ठरत नाही, असेही ते म्हणाले..आमदार पडळकर यांना समज दिलीभाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका ही आपल्या संस्कार, संस्कृतीला पटणारी नाही. अशा प्रकारचे वक्तव्य कुणाबद्दलही करू नये. आई-वडिलांचे नाव घेऊन टीका करणे आपल्या संस्कारात नाही. आमदार पडळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासह मी स्वत: समज दिली आहे, असेही त्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.