Mumbai News: राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होऊन ३ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. थेट नगराध्यक्ष आणि सहा हजार जागांसाठी मतदान होणार आहे, असल्याची माहिती राज्य माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी (ता. ४) पत्रकार परिषदेत दिली. .दरम्यान, मतदार यादीतील दुबार मतदार तांत्रिक आधाराने शोधले आहेत, मात्र त्याचा निश्चित आकडा नसल्याचे श्री. वाघमारे यांनी सांगितले. तसेच विरोधी पक्षांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला कळविले आहे. मात्र, त्याबाबत अद्याप कोणतेही उत्तर आले नसल्याचेही त्यांनी सांगितले..राज्यातील २४७ पैकी २४६ नगरपरिषदांसाठी निवडणूक होत आहे. १० नवनिर्मित नगरपरिषदा असून उर्वरित २३६ नगरपरिषदांची मुदत संपली आहे. १४७ पैकी ४२ नगरपंचायतींची निवडणूक होणार असून यातील १५ नव्याने तयार झालेल्या नगरपंचायती आहेत. नगरपंचायत निवडणूक एकसदस्यीय तर नगरपरिषदेत बहुसदस्यीय संख्या आहे. नगरपंचायतीच्या मतदाराने एक मत सदस्यासाठी, तर दुसरे नगराध्यक्षपदासाठी अशी दोन मते देणे अपेक्षित आहे. नगरपरिषदेत तीन ते चार मते अपेक्षित आहेत. निवडून आलेल्या उमेदवारांनी सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा आहे..Maharashtra Local Body Election: नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान, तर ३ डिसेंबरला लागणार निकाल.नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी १० ते १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. १८ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी, अपील नसेल तेथे २१ पर्यंत तर अपिल असलेल्या नामनिर्देशनपत्रांच्या ठिकाणी २५ नोव्हेंबरपर्यंत माघार घेता येणार आहे. २ डिसेंबर रोजी १३ हजार ३५५ मतमोजणी केंद्रांवर मतदान होणार आहे..या निवडणुकीसाठी १ कोयी ७ लाख तीन हजार ३५५ मतदार असून पुरुष मतदार ५३ लाख ७९ हजार ९३१, तर महिला मतदार ५३ लाख २२ हजार ८७० मतदार असतील. या निवडणुकीसाठी २४६ प्रभाग असून ६८५९ जागांसाठी मतदान होणार आहे. यातील महिलांसाठी ३ हजार ४९२, अनुसूचित जातींसाठी ८९५ आणि अनुसूचित जमातींसाठी ३३८ तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १८२१ जागा आहेत..Local Body Election: निवडणुकीची रणधुमाळी अन् दिवाळी.खर्च मर्यादेत वाढनगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांतील थेट अध्यक्ष आणि सदस्यपदाच्या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढविली आहे. अ वर्ग नगरपरिषद थेट नगराध्यक्षपद उमेदवारासाठी १५ लाख, सदस्य ५ लाख, ‘ब’ वर्ग नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष ११ लाख २५ हजार, सदस्य ३ लाख ५० हजार,‘क’ वर्ग नगरपरिषद नगराध्यक्षासाठी ७ लाख ५० हजार, सदस्य- २ लाख ५० हजार मर्यादा असेल. नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांना सहा लाख तर सदस्यांना २ लाख २५ हजार खर्चमर्यादा असेल..मतदान केंद्र आणि ईव्हीएमनगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयुक्त वाघमारे यांनी सांगितले. तसेच बहुसदस्यीय संख्या असल्याने व्हीव्हीपॅट मशिन वापरण्यात येणार नाही. १३ हजार ७२६ कंट्रोल युनिट आणि २७ हजार ४५२ बॅलेट युनिट असतील..‘दुबार नावांचा आकडा नाही’स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदारांना तांत्रिक आधारे शोधले आहे, अशी माहिती श्री. वाघमारे यांनी दिली. मात्र, त्यांचा आकडा नसल्याचेही त्यांनी सांगितले. ही नावे चिन्हांकित केली असून मतदान अधिकारी संबंधित नावांच्या मतदारांचा शोध घेऊन दोन दिवस आधी ते कुठे मतदान करणार आहेत याची खातरजमा करतील. तसेच जे मतदार याला प्रतिसाद देणार नाहीत, पण मतदानासाठी येतील त्यावेळी त्यांच्याकडून अन्य मतदान केंद्रावर मतदान केले नाही असे लिहून घेतले जाईल, असेही ते म्हणाले. आम्ही दबावाखाली नसून स्वायत्त असल्याचेही ते म्हणाले..नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात आचारसंहितानिवडणुकांसाठी नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू असेल. मात्र, अन्य ठिकाणी घेतलेला निर्णय मतदारांवर प्रभाव पाडणार असेल तर तेही आचारसंहितेच्या कक्षेत येईल, असे श्री. वाघमारे यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्ती आणि मदत कार्याला आचारसंहितेतून सूट दिली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.