Milk Price Hike: दूध विक्री दरात चार रुपये; खरेदी दरात तीन रुपये वाढ; सांगली-कोल्हापूर दूध व्यवसाय कल्याणकारी संघटनेचा निर्णय
Dairy Farmers Benefits: सांगली-कोल्हापूर जिल्हा दूध व्यवसाय कल्याणकारी संघटनेने दूध विक्री दरात प्रति लिटर चार रुपये, तर दूध खरेदी दरात तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (ता. १६) नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे.