Akola News: राज्यातील वनौषधी शेतीला चालना देण्यासाठी शासनाकडून कृषी उन्नती योजना-एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत अनुदान दिले जाते. या योजनेमुळे उत्पादनवाढीसह शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळते. मात्र, यावर्षी अर्ज करूनही अनुदानाबाबत कोणतीही ठोस हालचाल न झाल्याने वनौषधी उत्पादकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. .शेगाव येथे आयुष मंत्रालयाच्या पुढाकाराने आयोजित मेळाव्यात गुरुवारी (ता.२६) झालेल्या चर्चासत्रात शेतकऱ्यांनी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासमोर हा मुद्दा ठळकपणे मांडला..Fertilizer Subsidy: खत अनुदान थेट शेतकऱ्यांना द्यावे.गेल्या काही वर्षांपर्यंत वनौषधी अनुदान योजना आयुष मंत्रालयामार्फत राबविण्यात येत होती. सन २०२१ पासून ही योजना कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आली. यंदाच्या हंगामात सफेद मुसळी व इतर वनौषधी पिकांच्या लागवडीसाठी अनुदान देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. सफेद मुसळीला हेक्टरी दीड लाखांपर्यंत अनुदान घोषित झालेले होते. त्यानुसार शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले..शेतकऱ्यांनी कृषी खात्याच्या पोर्टलवर नोंदणी करून पिकपेऱ्याची माहिती व छायाचित्रे अपलोड केली. काही ठिकाणी सहायक कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्लाॅटला भेट देऊन पाहणीही केली. मात्र, आता अनुदान वितरणाबाबत तांत्रिक कारणे पुढे केली जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. हंगाम संपत आला तरी अनुदानाबाबत कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही..Irrigation Subsidy Issue: मराठवाड्याला अनुशेष अनुदानाचा वाटा कमीच .दुसरीकडे वनौषधींचे दर १०-१५ वर्षात वाढलेले नाहीत. खर्चात पाचपट वाढ झाली. हवामान बदलाचा फटका या पिकांना बसतो आहे. वनौषधी पिकांना सध्या पीकविम्याचे संरक्षण उपलब्ध नाही. त्यामुळे या पिकांना पीकविम्याच्या कक्षेत समाविष्ट करण्याची मागणीही पुढे येत आहे. शेगाव येथे आयोजित चर्चासत्रात मेळाव्यात विविध भागांतून आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या. पळशी झाशी (ता. संग्रामपूर) येथील सफेद मुसळी उत्पादक प्रताप मारोडे या पिकाला हमीभाव, पीकविमा व अनुदानातील अडचणी दूर करण्याची मागणी केली. विजय भालतिलक (शेगाव, जि. बुलडाणा) यांनी वनौषधी उत्पादकांना विशेष प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले..विदर्भात आयुर्वेदीय विद्यापीठ स्थापण्याची मागणीमनोहर भावे (रा. अंजनगाव सूर्जी, जि. अमरावती ) यांनी पानपिंपरी पिकावर दरवर्षी येणाऱ्या रोगांमुळे होणारे नुकसान सांगत पीकविमा किती आवश्यक आहे हे स्पष्ट केले. किडरोगांवरील उपाययोजनांसाठी कृषी विद्यापीठाने संशोधन करावे, अशी मागणी त्यांनी केली.धनंजय मिश्रा (अकोला) यांनी विदर्भात आयुर्वेदीय विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी मंत्र्यांसमोर मांडली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.