राज्यातील २२६ नगरपरिषदा आणि ३८ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडलेअनेक ठिकाणी बोगस मतदानावरून भाजप- शिदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडामहाडमध्ये विकास गोगावले- सुशांत जाबरे समर्थक भिडलेनाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्येही गोंधळ तासगावात रोहित पाटील- संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी कोल्हापूर जिल्ह्यात मतदारांचा मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद.Maharashtra Local Body Elections 2025: राज्यातील २२६ नगरपरिषदा आणि ३८ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान पार पडले. अनेक ठिकाणी बोगस मतदानाच्या आरोपावरून भाजप आणि शिदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे दिसून आले. .Sawantwadi Election: सावंतवाडीत भाजप- शिंदेसेनेत राडासिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे भाजप- शिंदेसेनेत राडा झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ही निवडणूक भाजप आणि शिवसेना वादामुळे गाजली. मतदानासाठी काही काही मिनिटे शिल्लक असताना भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली..Mahad Election: महाडमध्ये विकास गोगावले- सुशांत जाबरे समर्थक भिडलेरायगडमधील महाडमध्ये विकास गोगावले आणि सुशांत जाबरे समर्थक भिडल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या जाबरे यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याचे वृत्त आहे. जाबरे यांनी काही दिवसांपासून शिंदे सेनेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. ते महाडमधील बूथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी हा राडा झाला. .Maharashtra Elections 2025: कागलमध्ये मतदान केंद्राबाहेर जादूटोणा; अकोटमध्ये पैसे वाटपावरून गोंधळ, तर काही ठिकाणी 'ईव्हीएम'मध्ये बिघाड?. Manmad Election: मनमाडमध्ये हाणामारीनाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्येही गोंधळ झाला. येथे भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. मतदानासाठी अवघा एक तास शिल्लक असताना एका मतदान केंद्रावर काही महिला बोगस मतदान करत असल्याच्या आरोपावरुन भाजप उमेदवारांच्या नातेवाईकांनी त्याला आक्षेप घेतला. दोन्ही गट आमने-सामने आल्याने हाणामारीचा प्रकार घडला. .Pimpalner Clash: पिंपळनेरमध्येही राडाधुळ्यातील पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक मतदानादरम्यान भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. प्रभाग क्रमांक ४ मधील मतदान केंद्रांवर काही कार्यकर्ते घुसल्याने हा वाद निर्माण झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे पिंपळनेरमध्ये काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते..Local Bodies Result Date : नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल २१ डिसेंबर रोजी; नागपूर खंडपीठाचा आदेश .रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्याबोगस मतदारांच्या आरोपावरून मुक्ताईनगरमधील केंद्रावर गोंधळ उडाला. येथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या. पण पोलिसांनी येथील परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणली..Tasgaon News: रोहित पाटील- संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी बोगस मतदानाच्या कारणातून सांगलीच्या तासगावमध्येही दोन गट भिडले. आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. येथे एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. .Kolhapur Local Body Elections: कोल्हापूर जिल्ह्यात शांततेत मतदान, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसादकोल्हापूर जिल्ह्यातील १० नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतीमध्ये किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. कागल, मुरगूडमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. जयसिंगपूरमधील मतदान केंद्रावर मतदानाची वेळ संपायला शेवटचा अर्धा तास असताना मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसून आले. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवल्याने मतदान शांततेत पार पडले. येथे दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६१.९९ टक्के मतदानाची नोंद झाली होती..२१ डिसेंबरला मतमोजणीदरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय २३ नोव्हेंबर २०२५ रोजी अथवा त्यानंतर आल्याने २४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि ५४ सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यामुळे आज (दि.२ डिसेंबर) पार पडलेल्या आणि २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाचा निकाल २१ डिसेंबर (Results on Dec 21) रोजी जाहीर होणार आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिले आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.