Pune News: राज्यभर जमिनीचे सतत पोटहिस्से पडत असताना नव्या हिश्श्यांची मोजणी केली जात असताना नकाशे तयार नाहीत. परिणामी, पोटहिस्से आणि सात-बारा उतारे यांच्या संख्येत मोठी तफावत तयार झाली आहे. हा गोंधळ नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आता पोटहिस्सा मोजणीचा विशेष प्रकल्प हाती घेतला आहे..महसूल व वन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या नियंत्रणाखाली पोटहिस्सा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी महसूल सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार होणार आहे..Saline Soil Land: जमीन क्षारपडमुक्त करण्याचे काम सुरू .या समितीत जमाबंदी आयुक्त, सर्व विभागीय आयुक्त, नगररचना संचालक, भारतीय सर्वेक्षण संस्थेचे संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राचे संचालक काम करतील. तसेच, समितीचे सदस्य सचिव म्हणून महसूल विभागाच्या भूमापन कक्षाचे उपसचिव कामकाज सांभाळतील..‘‘पोटहिस्सा मोजणी कामावर सचिव समिती लक्ष ठेवणार आहे. या प्रकल्पाला वेग देण्यासाठी जमाबंदी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र कार्यकारी मंडळदेखील स्थापन करण्यात आले आहे. मंडळाला बळकट करण्यासाठी त्यात सर्व विभागीय आयुक्तांचा समावेश आहे..Land Survey: शेतकऱ्यांच्या जमीन मोजणी खर्चात बचत होणार; भूमि अभिलेख विभागाचा निर्णय.जमाबंदी आयुक्तालयाच्या भूमी अभिलेख (भूमापन) कक्षाचे उपसंचालक या मंडळाचे सदस्य सचिव असतील,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.एका अधिकाऱ्याने सांगितले, की जमाबंदी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी मंडळाला पोटहिस्सा मोजणी प्रकल्पाचे सर्व प्रशासकीय अधिकार देण्यात आले आहेत. जमाबंदी आयुक्तालयात त्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापन कक्षदेखील तयार केला जाणार आहे. जिल्हा पातळीवर हा प्रकल्प नेमका कसा राबवायचा,याची कार्यपद्धती अद्याप ठरलेली नाही. .परंतु, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात एक स्वतंत्र समिती तयार केली जाणार आहे. भूमी अभिलेख अधीक्षक या समितीचे सदस्य सचिव असतील. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक, भूमी अभिलेख उपसंचालक, भूमी अभिलेख उपअधीक्षक व जिल्हा माहिती अधिकारी या समितीचे सदस्य असतील..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.