Satara News : शासनाच्या सेवा पंधरावड्यात जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पाणंद रस्ते खुले करण्याचे अभियान महसूल प्रशासनाने हाती घेतले आहे. या पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून त्यांचे मजबुतीकरण केले जाणार आहे. .तसेच या रस्त्यांचे जीपीएसवर मॅपिंग करून त्याला सांकेतांक दिला जाणार आहे. तसेच त्याचे गाव नकाशांत आरेखन होणार आहे. जिल्ह्यातील १०२ मंडलांतील १०३ गावांतील ३८६ पाणंद रस्त्यांचे काम सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक मंडलातील एक एक गाव घेऊन हे काम सुरू झाले आहे. .Farm Road Drive : सेवा पंधरवाड्यात ‘पाणंद’साठी विशेष मोहीम .जेणेकरून यापुढे कोणीही शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करू शकणार नाही. तसेच शेतापर्यंत जाणारा मार्ग सुलभ झाल्यास वाहतुकीत सुलभता येऊन वेळेची आणि पैशाची बचत होणार असून शेती यांत्रिकीकरण, आधुनिकीकरणाला प्रोत्साहन मिळणार आहे..गावागावात शेतापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांवरून वाद, अतिक्रमणे यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची व पैशांचाही अपव्यय होत होता. अनेकद वादातून चुकीच्या घटनाही घडलेल्या पाहायला मिळतात. याचा सर्वांनाच त्रास होत असल्याने शेतकऱ्यांना शेतापर्यंत चांगला मजबूत रस्ता मिळावा, यासाठी राज्य सरकारने महाराजस्व अभियानांत पाणंद रस्ते खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. .त्यानुसार जिल्ह्यात हे अभियान राबवताना मंडलनिहाय एक गाव निश्चित करून पहिल्या टप्प्यात आजपासून कामाला सुरुवात झाली आहे. १०८ मंडलांतील प्रत्येकी एका गावापासून पाणंद रस्ता खुले करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.त्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, भूमिअभिलेख अधिकारी, मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांची टीम आता पाणंद रस्ते खुले करण्यासाठी कार्यरत झाली आहे. .Farm Road: गावशिवार रस्त्यांचे होणार सीमांकन.त्यासाठी प्रत्येक गावात अधिकारी व कर्मचारी शिवार फेरी करणार असून त्यातून पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणे शोधून ती हाटवणे, तसेच रस्त्यांचे मजबुतीकरण करणे, नकाशात या रस्त्यांचे आरेखन करून जीपीएस मॅपिंग केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी हक्काचा रस्ता उपलब्ध होणार आहे. यातून शेतकऱ्यांचा वेळ आणि पैशाची बचत होऊन कृषी यांत्रिकीकरण व अधुनिकीकरणाला प्रोत्साहन मिळणार आहे..आकडे बोलताततालुकानिहाय गावे व कंसात रस्त्यांची संख्या ःसातारा १४ (५२), जावळी ६ (४१), माण ९ (८२), वाई ७ (५४), खंडाळा ४ (३३), फलटण १० (३९), कराड १४ (८१), महाबळेश्वर ४ (चार), खटाव ११ (अकरा), पाटण १४ (१४)..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.