Pune News: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने विद्यापीठाशी संबंधित पुरविण्यात येणाऱ्या ५६ अधिसूचित सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन सुरू करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली..मंत्रालयात लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत विद्यापीठाशी संबंधित सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन उपलब्ध करून देण्याबाबत मंगळवारी (ता. २६) बैठक आयोजित घेण्यात आली. त्या वेळी श्री. पाटील बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर,.Aaple Sarkar Fee : ‘आपले सरकार सेवा केंद्रा’च्या शुल्कात झाली दुप्पट वाढ.तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, सहसचिव संतोष खोरगडे, दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू व संबंधित अधिकारी उपस्थित होते. विद्यापीठाशी संबंधित ऑनलाइन सेवांबाबत सादरीकरण अनुप बाणाईत यांनी केले..श्री. पाटील म्हणाले, ‘‘सर्व विद्यापीठांना व महाविद्यालयांना या सेवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ‘राइट टू सर्व्हिस’ या टॅबखाली आवश्यक माहिती प्रदर्शित करणे अनिवार्य आहे. विद्यापीठाने डॅशबोर्डवर आलेल्या अर्जांची पडताळणी करून या सेवा विहित मुदतीत विद्यार्थ्यांना मिळाव्यात या अनुषंगाने कार्यवाही करावी.’’.Aaple Sarkar Service : विविध दाखल्यांच्या दरात दुप्पट वाढ.ते म्हणाले, ‘‘उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत ५६ सेवा ऑनलाइन करण्यात आल्या असून २० सेवा या विद्यापीठाशी संबंधित आहेत. या सेवा राज्यातील जवळपास २० लाख विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणार आहेत. प्रत्येक महाविद्यालयामध्ये याकामी एका कायदेशीर अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. .विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. संकेतस्थळावर सर्व विद्यापीठाचा डेटा एका ठिकाणी दिसेल यामध्ये अर्ज किती आले आहेत, किती अर्ज प्रलंबित आहेत, किती अर्जावर कार्यवाही झाली याबाबतची सविस्तर माहिती दिसणार आहे.’’ .विद्यापीठांनी ब्लॉक चेन सेवा सुरू करावी कुलगुरूंनी सर्व सेवांवर काम करताना काळजीपूर्वक काम करावे. सर्व विद्यापीठांनी या सेवा लवकरात लवकर सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी. अशी सूचना श्री. पाटील यांनी केली. फेक, बोगस प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी विद्यापीठांनी ‘ब्लॉक चेन’ सेवा त्वरित सुरू करावी. यापुढे कोणतेही प्रमाणपत्र मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन सेवा विद्यापीठामार्फत देण्यात येणार आहेत, त्याची माहिती एसएमएसद्वारे कळवावी, असे त्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.