भूमीअभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गातील एकूण ९०३ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदत या पदासाठी नोव्हेंबरमध्ये होणार परीक्षा.Maharashtra Bhukarmapak Bharti 2025: महसूल विभागांतर्गत येणाऱ्या भूमीअभिलेख विभागातील गट क भूकरमापक संवर्गातील एकूण ९०३ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्याच्या सेवेत सामील होण्यासाठी ही तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन सादर करावेत, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे..भूकरमापक संवर्गातील पुणे विभागात ८३ पदे, कोकण २५९ पदे, नाशिक १२४, छत्रपती संभाजीनगर २१० पदे, अमरावती ११७ पदे, नागपूर विभागात ११० पदे रिक्त आहेत. या पदांसाठी १ ऑक्टोबरपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांना २४ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. यासाठी परीक्षेची प्रस्तावित तारीख १३ आणि १४ नोव्हेंबर अशी आहे. नियोजनाच्या दृष्टीने परीक्षेच्या तारखेत बदल होऊ शकतो, असे भूमी अभिलेख विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केले आहे. या पदासाठी १९,९००- ६३,२०० रुपये अशी वेतन श्रेणी आहे..Land Survey : पालघरमध्ये ‘ई-मोजणी’चा विक्रम.वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रताभूकरमाफक (गट-क) पदासाठी (Land Surveyor Recruitment) उमेदवाराचे वय १८ ते ३८ दरम्यान असावे. यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातून अथवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी (Diploma in Civil Engineering) अथवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावी. त्याच्याकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र असायला हवे.मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र अथवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र असावे..Land Registration: दस्तनोंदणीसाठी मोजणी नकाशा बंधनकारक.काय आहेत निवडीचे निकष?गुणवत्ता यादीत समावेश करण्यासाठी उमेदवाराने (Computer Based Test) परीक्षेत एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.एकाच पदासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांनी समान गुण मिळाल्यास ४ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्राधान्य क्रमाच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील.याबाबतची अधिक माहिती, अर्ज https://ibpsreg.ibps.in/gomsep25/ आणि https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.