22nd Maharashtra Irrigation Council: पाण्याचा थेंब न् थेंब जपण्याचा संकल्प करत बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथे रविवारी (ता. १२) २२ वी महाराष्ट्र सिंचन परिषदेची समाप्ती झाली. .‘कार्यक्षम सिंचन’ या मुख्य विषयावर आयोजित केलेल्या या परिषदेत राज्यातील कृषी तज्ज्ञ, प्रगतिशील शेतकरी, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच व्यासपीठावर येत कार्यक्षम पाणी वापराबाबत विविध चर्चासत्रांद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा जागर केला. भारती विद्यापीठाच्या वतीने आनंदराव पाटील प्रशाला येथे ही परिषद झाली..Maharashtra Irrigation Conference: बेलेवाडी- काळम्मात उद्यापासून महाराष्ट्र सिंचन परिषद आयोजित.परिषदेच्या पहिल्या दिवसापासूनच चर्चेचा रोख ‘उपलब्ध पाण्याचा थेंब न् थेंब कसा वाचवावा’ याकडे होता. पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आधुनिक सिंचन प्रणाली स्वीकारल्याशिवाय शेती शाश्वत होणार नाही, हा सूर त्यातून उमटला..विशेषतः पश्चिम महाराष्ट्रासाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या उसाच्या पिकाला ठिबक किंवा तुषार सिंचनाद्वारे मोजून-मापून पाणी देऊन उत्पादन वाढवण्याचे तंत्र तज्ज्ञांनी मांडले. शेतीपुढील सर्वात मोठे संकट असणाऱ्या वाढत्या जलप्रदूषणावर मार्ग काढण्यासाठी ‘पाण्यातील प्रदूषण कधी थांबणार’ या विषयावरील चर्चासत्रात नदी प्रदूषण आणि रासायनिक खतांमुळे दूषित होणाऱ्या भूजलावर चिंता व्यक्त करण्यात आली..Irrigation Care After Use: हंगामानंतर सिंचन संच बंद करण्यापूर्वीच्या ३ महत्त्वाच्या स्टेप्स.अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात राबवलेले यशस्वी पाण्याचे प्रयोग यावेळी सादर केले. तसेच, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या विविध पैलूंवर या परिषदेत प्रकाश टाकण्यात आला..यामध्ये प्रामुख्याने चिकोत्रा प्रकल्पाच्या रखडलेल्या कामांना गती देण्याबाबतच्या घडामोडी, गटशेती आणि ग्रामविकासामध्ये सरपंचांची सक्रिय भूमिका, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला उद्योजकता, दुग्धव्यवसाय आणि पशुपालनासह ‘विवेकी शेती’ची जोड आदी विषयांवर मंथन झाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.