Illegal Money Lending: अवैध सावकारीस सात वर्षांपर्यंत कारावास; एक लाखांच्या दंडासह तुरुंगवासासाठी दुरुस्ती विधेयक
Maharashtra Money Lending Act: राज्यात अवैध सावकारी केल्यास यापुढे पाच वर्षांऐवजी सात वर्षांच्या कारावासाची आणि ५० हजार रुपयांऐवजी एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करणारे महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमातील दुरुस्ती विधेयक मंगळवारी (ता. ७) विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मांडण्यात आले.