Voter List Stay : अहिल्यानगर जिल्ह्यात मुदत संपलेल्या ८४३ ग्रामपंचायतींच्या प्रलंबित निवडणुकांसाठी शुक्रवारी (ता. २४) प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र आॅनलाइन अडचणींमुळे राज्यातील थोड्याच ग्रामपंचायतींच्या याद्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे संगणक प्रणालीद्वारे तयार करण्यात येणारा मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने तात्पुरता स्थगित केला आहे. .यथावकाश हा कार्यक्रम जाहीर करणार असल्याचे आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे मतदार यादी कार्यक्रम राज्य आयोगाचे पुढील निर्देश येईपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी शुक्रवारी (ता. २४) प्रारूप, तर ४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले होते..Gram Panchayat Reservation: तब्बल ८६ ठिकाणी प्रभागरचना, आरक्षण जाहीर.जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाल्यानंतर निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम हाती घेतला. त्यानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती.त्यानंतर नागरिकांना मतदार यादीवर २४ ते २९ जुलैदरम्यान हरकती व सूचना दाखल करता येणार होत्या आणि त्यानंतर ४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्धी केली जाणार होती. .Grampanchayat Election: सोलापुरातील ७०२ ग्रामपंचायतींचा बिगुल वाजणार .आरक्षण, मतदार यादी आणि प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता तांत्रिक कारणांमुळे प्रारूप यादीच्या प्रसिद्धीस तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे पुढील कार्यक्रम व निवडणुकांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे..मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीजिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात ९४, पारनेर तालुक्यात ८८, पाथर्डी तालुक्यात ७९, श्रीगोंदे तालुक्यात ६२, अहिल्यानगर तालुक्यात ६०, नेवासे तालुक्यात ५९, कर्जत तालुक्यात ५५, अकोले तालुक्यात ५२, जामखेड तालुक्यात ४९, शेवगाव तालुक्यात ४८, राहुरी तालुक्यात ४४, कोपरगाव तालुक्यात २९, श्रीरामपूर तालुक्यात २७, राहाता तालुक्यात २५ ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे.